Blog

Press_Release
t_0031नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या मोफत दाखल ….
imagesपालकमंत्री नामदार गणेश.

Pages: 1 2

नागरिकांच्या सोयीकरिता नेरूळ माता बाल रुग्णालय बाह्य रुग्ण सेवा कार्यान्वित

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

नागरिकांच्या सोयीकरिता नेरूळ माता बाल रुग्णालय बाह्य रुग्ण सेवा कार्यान्वित

रुग्णालय संख्या वाढ अभिनंदनीय – ना. गणेश नाईक   नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन रुग्णालय संख्येत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय व त्याची केलेली अंमलबजावणी अभिनंदनास पात्र आहे, असे मत राज्याचे नवीन व नविकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. नेरूळ से. १५ येथील मॉंंसाहेब मीनाताई ठाकरे माताबाल रुग्णालय येथे बाह्य रुग्ण सेवा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मंत्री महोदयासमवेत महापौर सागर नाईक, उप महापौर अशोक गावडे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते  अनंत सुतार, परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे, ब प्रभाग समितीच्या अध्यक्ष स्नेहा पालकर, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष विनय मढवी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती गुरखे, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती शंकर मोरे, कार्यक्रमाचे निमंत्रक आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार व उपसभापती शिल्पा मोरे, स्थानिक नगरसेविका अनिता शेट्टी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उप आयुक्त जे.एन.सिन्नरकर तसेच इतर मान्यवर नगरसेवक , नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. नेरूळच्या रुग्णालय इमारतीत इतर संपूर्ण आरोग्य सुविधा कार्यान्वित करण्यासाठी थोडासा कालावधी लागणार असला तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता येथील नागरिकांना प्राथमिक स्वरुपाची आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बाह्य रुग्ण सेवा अर्थात ओ.पी.डी. सर्व्हिसेस सुरु करण्याचा निर्णय हा लोकहिताय आहे, असे कौतुकोद्गारही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. सर्वच क्षेत्रांप्रमाणे उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यातही नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून नेरूळ परिसरातही नागरिकांच्या सोयीकरिता प्राथमिक स्वरुपात बाह्य रुग्णसेवा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर सागर नाईक यांनी दिली. दरम्यान, अशाचप्रकारे नागरिकांच्या सोयीकरिता दि. १२ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ११.०० वा. बेलापूर गांव येथील माताबाल रुग्नालायःया इमारतीत तसेच दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. सेक्टर ३, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ  माताबाल रुग्णालयाच्या इमारतीत प्राथमिक स्वरुपात बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी.) शुभारंभ संपन्न होत आहे. Back To News….  ...

read more

9,500 NMMC workers to be made permanent

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

9,500 NMMC workers to be made permanent

9,500 NMMC workers to be made permanent – The general body of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) on Friday unanimously approved a resolution to employ around 9,500 contract workers working in its various departments on a permanant basis. “The contract workers in the city are provided facilities such as provident fund, bonus, gratuity on par with permanent staff. There is however a constant fear amongst them that they could be sacked by a new contractor ” – Guardian Minister Ganesh Naik. Back To...

read more

महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करावी

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करावी

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश नवी मुंबईकरांना महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जीर्णावस्थेतील विद्युत पोल, उघड्या डीपी, खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याची महावितरणाने तात्काळ दाखल घेऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील, तसेच एमआयडीसी परिसरातील विद्युत विभागाच्या समस्यांची सोडवणूक करावी. त्यासाठी महावितरणाने आपली स्वतंत्र यंत्रणा अपडेट करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पालकमंत्री ना. नाईक यांचा जनता दरबार पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, त्याचबरोबर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील गावठाण आणि झोपडपट्टीसारख्या भागालाही २४ तास विद्युत पुरवठा व्हावा यासाठी आ. संदीप नाईक यांनी अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद त्याच बरोबर लेखी निवेदन सादर करून पाठपुरावा सुरु केला आहे. त्या अनुषंगाने आज (ता.७) गुरुवारी वाशी येथे झालेल्या जनता दरबारात आ. संदीप नाईक यांनी नवी मुंबईत वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत व खराब झालेल्या डी.पी.बॉक्स, घरांवरती लोंबकळत असलेल्या विद्युत तारा या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री ना. नाईक यांनी महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करीत, नवी मुंबईतील महावितरणची संबंधित समस्यांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.  या कामासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रभागवार कार्यरत असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना देखील पालकमंत्री ना. नाईक यांनी दिल्या. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना  नोकरीत कायमस्वरूपी घ्यावे, अशी मागणी जनता दरबारात ना. नाईक यांच्याकडे केली. यासंदर्भात एपीएमसीच्या  आस्थापनेसोबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे ना. नाईक यांनी सांगितले. रबाळे एमआयडीसी परिसरातील एल्डर हेल्थ केअर (आर-२८) या कंपनीतील कामगारांचा रखडलेला पगार देण्याच्या सूचना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या. दोन दिवसात दोन महिन्यांचा पगार देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कबुल केले आहे. या कंपनीतील कामगारांचा ७ महिन्यांचा पगार रखडला आहे. ना. नाईक यांनी कामगार वर्गाविषयक घेतलेल्या चांगल्या भूमिकेबाबत एल्डर कंपनीच्या कामगारांनी पालकमंत्री ना. नाईक यांचे आभार मानले.   अनधिकृत रिक्षा स्टॅन्डवर कारवाई करा – पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी अनधीकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना आरटीओ प्रशासनाला दिल्या. नवी मुंबईतील विविध रिक्षा युनियन्स संदर्भातील प्रश्नांवर बोलताना ना. नाईक म्हणाले कि, शहरातील रिक्षा स्टॅन्डवरील युनियनच्या नाम फलकावर कोणताही पक्ष अथवा युनियनच्या पुढाऱ्याचा फोटो असेल , तर तो तातडीने काढण्याची कारवाई आरटीओ ने करावी. शहरात अनधिकृत रिक्षा स्टॅन्डमुळे प्रवाशांना त्रास होत असेल तर आरटीओच्या परवानगीशिवाय असलेले रिक्षा स्टॅन्ड बंद करावेत, अशा सूचना ना. नाईक यांनी आरटीओ प्रशासनाला केल्या.   Back To...

read more

नवी मुंबईकरांना मिळणार लवकरच २४ तास गॅस सेवा

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

नवी मुंबईकरांना मिळणार लवकरच २४ तास गॅस सेवा

आ. संदीप नाईक यांची मागणी लवकरच पूर्ण होणार महानगर गॅस कंपनीने आठ दिवसांत सर्व्हे करावा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे बैठकीत निर्देश नवी मुंबई शहरातील विविध ठिकाणी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने नवी मुंबईतील नागरिकांकरिता गॅस लाईन टाकून सुविधा देण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना.नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने येत्या आठ दिवसात शहरात गॅस पाईप लाईन टाकण्यासंदर्भात सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. नाईक यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत नवी मुंबईकरांना २४ तास गॅस सेवा उपलब्ध होणार आहे. ऐरोली मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांच्याकडे नागरिकांनी पाईप लाईनच्या माध्यमातून घराघरात गॅस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ. नाईक यांनी या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे ही सेवा सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज (ता.७) झालेल्या जनता दरबारात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला आ. संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे आणि महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती, उपमुख्य व्यवस्थापक दास, मॅनेजर प्रभाकर तांबे त्याच बरोबर नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बैठकीत आ. संदीप नाईक यांनी शहरातील सिडको गावठाण विस्तार योजना परिसरात व माथाडी वसाहतीमध्ये गॅस पुरवठा लाईन टाकण्याबाबत काय कार्यवाही करण्यात येत आहे. त्याच बरोबर ऐरोलीतील नव्याने विकसित होत असलेल्या सेक्टर-२० (ए/बी/सी/डी), घणसोली नोड, कोपरखैरणे सेक्टर – ११ मधील नव्याने विकसित होत असलेल्या परिसराकरिता नवीन गॅस जोडणी संदर्भात आ. नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार महानगर गॅस लिमिटेडने आतापर्यंत काय कार्यवाही केली. या संदर्भातील आढावा आ. संदीप नाईक आणि पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जाणून घेतला. यावेळी शहरातील मागणी करण्यात येत असलेल्या प्रभागाबरोबरच संपूर्ण शहरातील मागणी करण्यात येत असलेल्या प्रभागाबरोबरच संपूर्ण शहरातील नागरिकांना गॅस पाईप लाईनने गॅस पुरवठा करण्यासंदर्भात येत्या ८ दिवसांत सर्व्हे करण्याचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. या सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर यासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. नाईक म्हणाले. त्यामुळे शहरवासीयांना गॅस लाईनने गॅस पुरवठा होईल आणि नागरिकांना २४ तास गॅस सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी व्यक्त केला. महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती यांनी आ. नाईक यांनी व्यक्त केला. महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती यांनी आ. नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार संबंधित ठिकाणी गॅस पुरवठा करण्यासाठी लिमिटेड देखील प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. Back To...

read more

पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार

Posted by on 8-08-14 in News | 0 comments

पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश     महापालिकेच्या आगामी महासभेत ठराव येणार सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल नवी मुंबई महापालिकेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या आणि विविध ठेकेदारांमार्फत पालिकेच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ९५०० विविध संवर्गातील कामगारांसाठी शुभवर्तमान असून या कामगारांना कायम करण्याचा ठराव पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार ८ ऑगस्ट २०१४ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. पालकमंत्री नामदार नाईक यांनी पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वाची बैठक घेऊन या कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी कंत्राटी कामगारांना नेहमीच सामाजिक न्याय प्रदान केला आहे. या कामगारांना समान कामास समान वेतन मिळवून दिले आहे. पीएफ, बोनस, ग्रॅज्यूईटी, आदींचा लाभ त्यांना मिळतो आहे. मात्र गेली अनेक वर्षे कार्यरत असूनही हे कामगार कायम झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना सामाजिक स्थैर्य लाभलेले नाही. साफसफाई, पाणीपुरवठा, मल:निसारण, स्मशानभूमी, डंपिंग ग्राउंड, उद्यान, हिवताप नियंत्रण, मूषक नियंत्रण, कोंडवाडे, परिवहन, रुग्णालये, शिक्षक, बहुउद्देशीय कामगार, ठोक मानधनावरील कामगार, मॅकेनिकल व इतर सर्व संवर्गातील कामगारांनी त्यांच्या कामाची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. सफाई खात्यात २८६०, पाणीपुरवठा खात्यात ४५०, मलनिस्सारण खात्यात २३८, परिवहन उपक्रमात ९६९, उद्यान विभागात ४१५ इत्यादी सर्व खात्यांत मिळून कंत्राटी कामगारांचा आकडा सुमारे ९५०० आहे. कंत्राटीचा रोजगार वाचला पाहिजे यासाठी ठेकेदार बदलला तरी कामगार बदलता कामा नये हे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचे कामगारहिताचे धोरण अवलंबले आहे. या कामगारांना कायम करण्याचा अशासकीय ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. त्यावर साधकबाधक चर्चा घडवून आणल्यानंतर तो ठराव मंजूर करून राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे हा ठराव आल्यानंतर स्वतः पालकमंत्री नामदार गणेश नाईक हे मंत्रालयीन स्तरावर संबंधित विभागांची बैठक आयोजित करून या ठरावास मान्यता घेणार आहेत. त्यामुळे या हजारो कामगारांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असाच ठरणार आहे. हा ठराव मंजूर होईपर्यंत या कामगारांचा बेसिक पगार आणि भत्ते वाढविण्याची सूचना देखील पालकमंत्री नामदार नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या पालिकेच्या ठरावास राज्य शासनाने तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी माजी खासदार आणि नवी मुंबई महापालिकेचे प्रथम महापौर डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केली आहे. हि मंजुरी न मिळाल्यास प्रसंगी कामगारहितास्तव राज्य शासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची भूमिका त्यांनी बोलून दाखविली आहे. या कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी टाकलेले आणखी एक पाऊल असल्याचे बोलले जात आहे. गेली अनेक वर्षे मी सफाई खात्यात इमाने इतबारे नोकरी करीत आहे. नामदार गणेश नाईक यांच्यामुळे आमची नोकरी टिकली असून अनेक लाभही मिळाले आहेत मात्र नोकरीत कायम नसल्याने आयुष्यात स्थैर्य नाही. आता कायम करण्याचा निर्णय होणार असल्याचे ऐकून समाधान झाले आहे. – जगदीश म्हात्रे , सफाई कामगार कोपरखैरणे आम्हाला नोकरीत कायम करण्याचा निर्णय होणार असल्याचे ऐकून आनंद झाला आहे. पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी नेहमीच सर्वसामान्य कामगारांचे हित जोपासले आहे. नामदार नाईक आम्हाला कायम करून न्याय देतील, असा विश्वास आहे. – नरेंद्र वैराळ , कामगार, पाणीपुरवठा विभाग पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या कल्याणकारी धोरणानुसार समान कामास समान वेतन देणारी नवी मुंबई महापालिका हि राज्यातील पहिली महापालिका आहे. या कंत्राटी कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक क्रांतीच आहे. – रमाकांत पाटील , कार्याध्यक्ष , नवी मुंबई म्युनिसिपल युनियन Back To...

read more

आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे आवाहन बोनकोडेतील पहिल्या महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ मागील केंद्रातील युपीए सरकारने तसेच राज्यातील विद्यमान आघाडी सरकारने लोकहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्यदायी योजना, युपीए सरकारची अन्नसुरक्षा योजना या सर्वसामान्यांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांतील राज्यातील आघाडी सरकारचे काम कौतुकास्पद असून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व ज्येष्ठ समाजसेवक मुकुंद नाईक यांच्या पुढाकाराने बोनकोडे येथील शिवशक्ती कार्यालयासमोरील कै. बी.एफ. नाईक निवास येथे पालकमंत्री ना.नाईक यांच्याहस्ते महा ई सेवा केंद्राचे उद्घाटन आज पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक, ई सेवा केंद्राचे संचालक मुकुंद दत्तात्रय नाईक,सुरेश दादा नाईक, रमाकांत नाईक,दत्तात्रय बाबुराव नाईक, अशोक नाईक, परिवहनचे माजी सभापती हनुमंत दळवी, नगरसेवक प्रभाकर कांबळे, गजानन दळवी, नगरसेवक कोंडीबा तिकोणे, सुरेश सालदार, फकरुद्दीन पटेल, जीवनधारा समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. नाईक म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या असणाऱ्या योजना पोहोचाव्यात. तथा अतिअल्प गटातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, या उद्देशाने भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने राजीव गांधी आरोग्यदायी योजना अमलात आणली आहे. आघाडी सरकारने शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातही अन्न सुरक्षा योजना आणून गोरगरीब जनतेला अल्प दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. अशा विविध योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जनतेकरिता अमलात आणल्या आहेत.या महा ई सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना विविध योजनाचा लाभ घेत यावा तथा आपण भारतीय असल्याची आपली एक ओळख असावी या उद्देशाने पॅन कार्ड, बँकेच्या सुविधा शासकीय दाखले, विजेची बिले अशा विविध कामासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे या केंद्राच्या मार्फत नागरिकांना लवकर मिळणार आहे. बोनकोडे येथील महा- ई- सेवा केंद्रा अंतर्गत भारत सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना, उम्मीद रोजगार, पॅन सुविधा, बँकिंग सुविधा, आधार कार्ड, विविध शासकीय दाखले, प्रतिज्ञा पत्र व ७/१२ चा उतारा, सर्व प्रकारचे मोबाईल अथवा डी. टी. एच रिचार्ज सुविधा, वीज बिल भरणा केंद्र, विमा योजना इत्यादी संदर्भात विविध शासकीय दाखले उपलब्ध होणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. Back To...

read more

कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व सर्वसामान्य नागरिकांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक थांबावी त्याच बरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्रदान व्हावा यासाठी डीम्ड कन्व्हेयन्सची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली होती. त्यासाठी डॉ. संजीव गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर देखील पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे आता नवी मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आपला मालकी हक्क मिळणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीडची (भाडे पट्टा करार) प्रक्रियेत सर्व सामान्य नागरिकांची बिल्डरांकडून फसवणूक होते. हि फसवणूक थांबावी त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्रदान व्हावा यासाठी डीम कन्व्हेन्स (मानीव अभिहस्तांतरण) करणे आवश्यक आहे. अनधिकृत किंवा खाजगी विकासकाकडून बांधण्यात आलेल्या इमारतींचे संपूर्णपणे कायदेशीर मालकी हक्क न मिळाल्याने अशा सोसायट्यांना नवी मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांना यांचा लाभ घेता यावा आणि सहकारी संस्थांची होणारी फसवणूक थांबावी यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्याच बरोबर मंत्रालयात एक बैठक देखील घेतली होती. त्याच बरोबर डॉ.संजीव गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व सामान्यांच्या प्रश्नी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. नवी मुंबईत सिडकोने विकासकांना करारावर विकलेल्या भूखंडावरील तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडावरील इमारतीतील रहिवाशांनी स्थापन केलेल्या सरकारी गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीड ( भाडे पट्टा करार ) करून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आणि या सोसायट्यामधून राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल डॉ.संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांनी राज्य सरकारचे नवी मुंबईकरांच्या वतीने शतश: आभार मानले आहे. Back To...

read more

रमजान एकात्मतेची शिकवण देणारा सण

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

रमजान एकात्मतेची शिकवण देणारा सण

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन नवी मुंबई शहरात मुस्लिम, शीख, जैन आणि हिंदू समाज बांधव एक दिलाने वास्तव्यास आहेत. सर्वच समाज बांधव आपापल्या परीने धार्मिक सण साजरे करतात. मुस्लिम बांधवांनी नवी मुंबईला, समानतेची जोड दिली आहे. किंबहुना आपल्या भगवंताने दिलेला सामाजिक एकात्मतेचा संदेश समाजात रुजवीत रमजान सणाच्या इफ्तार पार्टीतून एकात्मतेची शिकवण दिली आहे, असे गौरवोद्गार  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी काढले. जीवनधारा आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील अॅबोट हॉटेलमध्ये रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना. नाईक बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा महापौर सागर नाईक होते. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे पोलिस आयुक्त एल.के.प्रसाद, डॉ. संजीव गणेश नाईक, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आलम बाबा,स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, माजी उपमहापौर भारत नखाते, नगरसेवक साबु डॅनियल, समिलभाई शेख, रहिम खत्री, आलम तन्वर, नजर बिजणारी, सलीम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संजीव गणेश नाईक यांनी इफ्तारच्या या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना समाज बांधवांनी नवी मुंबईतील उपक्रमात सहभाग घेऊन एक आपुलकी शहराशी जोडली असल्याचे म्हणाले. येत्या मंगळवारी ( ता. २९ ) रमजान ईदच्या शुभेच्छा देखील डॉ. नाईक यांनी दिल्या. महापौर सागर नाईक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. नवी  मुंबईत मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने राहत आहे. या समाजाने गुण्या गोविंदानेसमिलभाई शेख, रहिम खत्री, आलम तन्वर, नजर बिजणारी, सलीम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संजीव गणेश नाईक यांनी इफ्तारच्या या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना समाज बांधवांनी नवी मुंबईतील उपक्रमात सहभाग घेऊन एक आपुलकी शहराशी जोडली असल्याचे म्हणाले. येत्या मंगळवारी ( ता. २९ ) रमजान ईदच्या शुभेच्छा देखील डॉ. नाईक यांनी दिल्या. महापौर सागर नाईक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. नवी  मुंबईत मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने राहत आहे. या समाजाने गुण्या गोविंदाने राहत असताना शहराच्या विकासात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे. रोजा इफ्तार पार्टीच्या माध्यमातून समाज बांधवांनी एकत्र यावे त्यांच्यात सामाजिक विचारांची समानतेच्या भावनांची रुजवण व्हावी हाच उद्देश असल्याचे महापौर नाईक म्हणाले. पोलिस आयुक्त प्रसाद यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम करत असताना नवी मुंबई शहरात सर्व धर्मियांनी असणारी एकात्मता पाहता नवी मुंबई हे अशा प्रकारचे समानतेचे शिकवण देणारे एकमेव शहर असल्याचे म्हणाले. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.   Back To...

read more

नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीयांकडून सन्मान

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीयांकडून सन्मान

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षात अविरतपणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पार पडल्या. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील ७ महानगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती करिता दूरदृष्टी विकासाचे नियोजन करत नवनवीन योजना राबविल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. २५ जूलैला झालेल्या शेवटच्या नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय खासदार, आमदार आणि सदस्यांनी पालकमंत्री ना. नाईक यांचे आभार मानले. जिल्ह्याच्या नियोजनाबाबत सर्वांगीण विकासाची भूमिका मांडणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्यातील एकमेव पालकमंत्री असल्याची भावनाही यावेळी सदस्यांनी व्यक्त केली. पाच वर्षातील आढावा आणि मागील इतिवृत्तांचा आणि आर्थिक नियोजनाचा आढावा घेत ठाणे जिल्हा नियोजन समितीची आजची सभा ठाण्यातील नियोजन भवनात पार पडली. या बैठकीला खा. कपिल पाटील, आ. संदीप नाईक, आ. निरंजन डावखरे, आ. गणपत गायकवाड, आ. प्रकाश भोईर, आ. विष्णू सावरा, आ. किसन कथोरे, आ. विवेक पंडित, आ. रामनाथ मोते, आ. प्रताप सरनाईक, आ. एकनाथ शिंदे, माजी आ. रामनाथ मोते, ठाण्याचे पालक सचिव के.पी.बक्षी, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नाईक यांनी आजच्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा सदस्यांकडून जाणून घेतला . सदस्यांनी आपल्या तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती नियोजन समितीचे अध्यक्ष ना. नाईक यांच्याकडे दिली. पालकमंत्री ना. नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मागील वर्षात झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्याचा विकास करताना सर्वांना सामावून घेतल्याने ग्रामीण असो वा नगरपालिका, महानगरपालिका परिक्षेत्र यातील नागरिकांना आपण न्याय देऊ शकल्याची भावना व्यक्त केली. नियोजन समितीकडे असणारा निधी, शासनाच्या विविध प्राधिकरणाकडून प्रस्तावित कामांसाठी व योजनांसाठी आलेला निधी यातून जिल्ह्याला एक वेगळा आयाम देण्यात यशस्वी झाल्याबद्दल समाधानी असल्याचेही पालकमंत्री ना. नाईक म्हणाले. आजच्या बैठकीत आ. प्रताप सरनाईक, आ. विवेक पंडित, आ. किसन कथोरे, आ.विष्णू सावरा यांनी ५ वर्षात पालकमंत्री ना. नाईक यांनी नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय पूर्ण केल्याबाद्द्दल त्याच बरोबर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ना. नाईक यांचे शब्दरूपी आभार मानले. पालकमंत्री ना. नाईक पुढे म्हणाले कि, भाईंदर येथे स्वतंत्र  आरटीओ कार्यालय सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. तसेच शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी यंत्रणा कृषी विभागाने उभारावी. जिल्हा परिषदेने रस्ते, पाणी, शाळा संदर्भात सुरु केलेली कामे त्वरित पूर्ण करावीत. याच बैठकीत आदिवासी उपयोजने अंतर्गत सुरु असलेली कामे सुरु करणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्व्हेक्षण करणे, मुलांच्या वसतिगृहाची सोय करणे, विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश देणे, आदिवासी भागातील शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न, विना अनुदानित शाळांना अनुदान , घोडबंदर किल्ला दुरुस्ती, क्लस्टर डेव्हलपमेंट, लघुपाटबंधारे प्रकल्पाची कामे अशा अनेक विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले.   जिल्ह्याला मोनो-मेट्रोने जोडा – आ. संदीप नाईक  सदस्य मुकेश म्हात्रे यांनी भिवंडी ते कल्याणला मोनो आणि मेट्रो सेवेने जोडण्याची मागणी सदस्यांनी केली होती. तर आ. संदीप नाईक यांनी ठाणे, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्याला मोनो व मेट्रो सेवेने जोडण्याची मागणी केली. या संदर्भात बोलताना पालकमंत्री  ना. नाईक यांनी मुंबई शहरात सुरु झालेली मेट्रो आणि मोनो सेवाही नियोजन अभावी तोट्यात चालली आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात मोनो रेल्वे सुरु करताना नियोजन आणि अधिक वापर होणाऱ्या ठिकाणांची निवड करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या संदर्भातील आढावा घेण्याकरिता येत्या बुधवार ३० जुलै रोजी मंत्रालयीन स्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे...

read more

पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत

पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत नगरसेविका रेखा म्हात्रे यांचा पाठपुरावा सफाई कामगारांना पगारवाढ तीन प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरी करावे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळावी, यासाठी स्थानिक नगरसेविका रेखा विनोद म्हात्रे व प्रभाग क्रमांक ८९ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष विनोद म्हात्रे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून पोद्दार प्रशासनाने प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचे मान्य केले असून शाळेतील कामगारांना भरघोस पगारवाढही दिली आहे. पालकमंत्र्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे करावे गावातील नागरिकांनी त्यांचे शतश: आभार मानले आहेत. याविषयी माहिती देताना नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले कि, गेल्या दीड महिन्यापासून आम्ही येथील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याची मागणी करीत होतो. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा करीत होते. अखेर पोद्दार प्रशासनाने या मागण्या मान्य केल्या असून प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना फी मध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. शाळेतील सफाई कामगारांना दरमहा ३ हजार ३०० ते ३ हजार ४५० रुपये पगारवाढ दिली आहे. त्यानुसार त्यांचा एकूण पगार ९ हजार २५० ते ९ हजार ७५० इतका झाला आहे. ही पगारवाढ तीन वर्षापासून असून प्रत्येक वर्षाला १० टक्के पगारवाढ करण्यात येणार आहे. तसेच करावे गावातील दीपक भोईर, प्रीती भोईर, व कु. म्हात्रे या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना क्लार्क या पदावर शाळेने कामावर घेतले आहे. करावे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुमारे ५० ते ६० प्रकल्पग्रस्तांची मुले शिकत असून या शाळेत ३५ सफाई कामगार आहेत. सफाई कामगारांना पगारवाढ व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत, यासाठी आम्ही पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत होतो. यास यश आले आहे. – विनोद...

read more
Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube