Blog

Press_Release
t_0031नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या मोफत दाखल ….
imagesपालकमंत्री नामदार गणेश.

Pages: 1 2

धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करणार

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करणार

पालकमंत्री  ना.  गणेश  नाईक  यांचे अभिवचन नवी मुंबईतील धनगर समाज प्रतिष्ठान आणि मल्हार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी, १२ वी, पदवीधर तसेच एमपीएससी व युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि यशासाठी योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नेरूळ येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. गणेश नाईक यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता आपण करू, असे अभिवचन दिले. सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्यानंतर १० वी, १२ वी आणि एमपीएससी व युपीएससी पदवीमध्ये यशस्वीरित्या उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाज प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत गोरड यांनी नुकत्याच विविध परिक्षेत चांगले गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला. विविध परिक्षेत दिवस-रात्र अभ्यास करून उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या दिवशी मोठ्या प्रमाणात समाधान दिसून आले. यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक पोहेकर यांनी धनगर समाजाची गणना आता अनुसूचित जातींमध्ये करण्यात यावी व या समाजासाठी नवी मुंबईमध्ये आहिल्याबाई भवन उभे करावे, जेणेकरून आजच्या काळात धनगर समाजातील विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ तयार होईल, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडे केली. अशोक पोहेकर यांनी केलेल्या मागण्यांवर भाष्य करताना ना. गणेश नाईक यांनी धनगर समाजाच्या विविध समस्या जाणून घेऊन धनगर समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य वितरण मंडळाचे चीफ जनरल मॅनेजर संदेश हाके, कोकण विभागीय अधिकारी जगन्नाथ वीरकर, सहाय्यक आयुक्त राजेंद्र सरोदे, एस. टी. महामंडळाचे ज्येष्ठ अधिकारी मुकुंद बंडगर, नगरसेवक सुरज पाटील, आयसीएल महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश यमगर, उत्पादन शुल्क विभाग ठाणे जिल्ह्याचे अधिक्षक मनोहर अनसूळे, नगरसेविका स्वाती बुरके आदी मंडळींनी आपली उपस्थिती दर्शविली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महादेव अर्जुन, उपाध्यक्ष भास्कर यमगर, उपाध्यक्ष श्यामराव आलदर, उपाध्यक्ष अण्णासाहेब मुढे, देवाप्पा लवटे, दत्ताजी व्हावळ, मनोहर बंडगर, संतोष पळसकर, संजय खर्जे,शरद लुबाळ यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर समाज प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत गोरड यांनी केले तर आभारप्रदर्शन खजिनदार संजय गारळे यांनी केले.   Back To...

read more

स्त्रीभृणहत्या रोखण्यात नवी मुंबईच्या नागरिकांची महत्वपूर्ण कामगिरी

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

स्त्रीभृणहत्या रोखण्यात नवी मुंबईच्या नागरिकांची महत्वपूर्ण कामगिरी

जनता दरबारात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवोद्गार नवी मुंबईच्या नागरिकांनी स्त्रीभृणहत्या रोखण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली म्हणूनच नवी मुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाल्याची भावना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केली. वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका, सिडको, पोलीस प्रशासनाचे अधिकारी वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने स्त्रीभृणहत्या मोहीम जोरदारपणे राबवून दुसरा क्रमांक पटकावला. या संदर्भाने पालकमंत्री ना.नाईक यांच्याहस्ते आरोग्य अधिकारी डॉ. आर.डी. निकम यांचा सत्कार केला. आजच्या जनता दरबारात परिचारिकांना मनपाच्या आरोग्य विभागात कायमस्वरूपी सामावून घेणे, कलिंगड विकणाऱ्या व्यापाऱ्यांना पर्यायी भूखंड देणे, तसेच सिडको, मनपा, शिक्षण विभाग, पोलीस विभाग संदर्भात तक्रारींवर चर्चा करण्यात येउन त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना. नाईक यांनी दिले. नवी मुंबई महापालिकेतील कामगारांना समान काम तत्वावर वेतन दिले जाते. तेच वेतन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कामगारांना देण्यात येईल, तसेच कायद्याच्या कक्षेत राहून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ना. नाईक यांनी दिले. नवी मुंबई महापालिकेत ठेका पद्धतीने गेल्या १५ ते २० वर्षापासून सेवेत असणाऱ्या पाणी पुरवठा विभागातील पंप ऑपरेटर यांनी आपल्या समस्या पालकमंत्री ना. नाईक यांच्या समोर मांडल्या. तसेच त्यांच्या वेताणाचाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. या कामगारांच्या प्रश्नांवर पालकमंत्री ना. नाईक यांनी ‘ समान काम समान वेतन ‘ तत्वानुसार यांनाही वेतन देण्यात यावे, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच कायद्याच्या कक्षेत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडून भाडेतत्वावर सानपाडा प्रभाग क्रमांक ६४ येथे फेरीवाल्यांसाठी भूखंड घेतला होता. येथे गेल्या १५ वर्षापासून अधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत आहेत.मात्र लिझ संपल्यामुळे सिडकोने या भूखंडावरील फेरीवाल्यांना कारवाईची नोटीसा दिल्या आहेत. मात्र फेरीवाल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची खबरदारी पालिकेने घेत, भूखंड कायमस्वरूपी महापालिकेकडे वर्ग करण्याची कारवाई करावी असे निर्देश ना. नाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.   Back To...

read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करा

Posted by on 7-07-14 in News | 0 comments

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करा

पालकमंत्री ना.गणेश नाईक यांची पालिका अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व घटकांना अंतिम मुदत   पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर- १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या लोकाभिमुख आणि शहराला भूषणावह ठरणाऱ्या वास्तूची उभारणी करण्यात काही तांत्रिक बाबींमुळे विलंब होतो आहे, हि वस्तुस्थिती आहे. या भवनाचे काम करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित घटकांनी या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर हाती घेऊन डॉ. आंबेडकर महपरिनिर्वाण दिन म्हणजेच ६ डिसेंबर २०१४ पर्यंत ते पूर्ण करण्याचे सक्त निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले आहेत. नवी मुंबईसाठी प्रेरणादायी अशा या स्मारकाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही ना.नाईक यांनी दिला आहे.   पालकमंत्री ना. नाईक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, आ.संदीप नाईक, महापौर सागर नाईक, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, नगरसेवक अशोक पाटील, एम.के.मढवी, माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक भारत जाधव , राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य जी. एस. पाटील, फ प्रभाग समितीचे सदस्य दीपक पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, कार्यकारी अभियंता हरिश चिचारीया, उपअभियंता जयंत कांबळे, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.   स्मारकाची सुनियोजितपणे उभारणी व्हावी यासाठी पालकमंत्री ना. नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तर डॉ. संजीव नाईक आणि स्थानिक आमदार संदीप नाईक यांनी देखील अनेकदा यासंबंधी बैठका घेतल्या आहेत. तसेच पाहणी दौरा करून बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला...

read more

महामोर्चाने हादरली सिडको !

Posted by on 6-06-14 in News | 0 comments

महामोर्चाने हादरली सिडको !

मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन होणार आणखी तीव्र प्रकल्पग्रस्तांच्या घरांना हात लावाल तर खबरदार – आ. संदीप नाईक. आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबईतील गाव – गावठाणातील प्रकल्पग्रस्त नागरिक , सिद्कोनिर्मित धोकादायक इमारतींमधून राहणारे रहिवासी, झोपडपट्टीवासीय, रेल्वे प्रकल्पग्रस्त नागरिक, माथाडी, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त, बीएमटीसी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आज सिडको महामंडळ आणि कोकण भवन कार्यालयावर महामोर्चा नेला. या महामोर्चात सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाले होते. या प्रचंड महामोर्चाने सिडको प्रशासन आणि शासन हादरले असून वर्षानुवर्षे  रखडलेल्या मागण्या जर तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक  तीव्र कण्याचा इशारा या महामोर्चाचे आयोजक डॉ. संजीव गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या घरांना हात लावाल तर खबरदार असा इशारा आमदार नाईक यांनी सिडकोला यावेळी दिला. मोर्चेकारांनी केलेल्या विनंतीनुसार राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारले आणि या मागण्या मंत्रिमंडळात सोडविण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करू. आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा दिलासा आंदोलकांना दिला. नवी मुंबई महापालिकेच्या नवीन मुख्यालयाजवळील क्रोमा इलेक्ट्रोनिक्स किल्ले गावठाण येथून या महामोर्चाला अतिशय शिस्तबद्ध    पणे सुरुवात झाली. बिपी मरीन,सकाळ भवन येथून हजारोंच्या संख्येने नागरिक मागण्या मंजूर करण्यासाठी कडक उन्हाची पर्व न करता पुढे जात होते. महापालिकेच्या जुन्या मुख्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर होऊन मोर्चाला मान्यवरांनी मार्गदर्शन  केले. आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, असा इशारा डॉ. संजीव गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात शासन, सिडको आणि एमआयडीसीला दिला. राज्यात आघाडीचे शासन असतानाही जनतेला उन्हातान्हात आंदोलन करावे लागत आहे,हे दुर्देवी असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. यह तो झांकी है अभी बहोत कूच बाकी आहे., असे सांगत त्यांनी हा मोर्चा पाहून आता तरी सरकारला जाग येईल, अशी आशा व्यक्त केली. गाव- गावठाणातील घरे नियमित करणे, साडेबारा  टक्के भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणे, सिडको वसाहतीमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचा अडीच एफएसआयच्या माध्यमातून पुनर्विकास, चार एफएसआयच्या माध्यमातून एसआरए योजनेतून झोपड  पट्ट्यांचा विकास, माथाडी कामगारांना घरे, बीएमटीसी कामगारांचे पुनर्वसन इत्यादी प्रलंबित मागण्यांबाबत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती राधा आणि कोकण विभागीय उपयुक्त मोपलवार या दोघांना लेखी निवेदन दिले आहे. या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी आपल्या भाषणात दिला आहे.   प्रकल्पग्रस्त आणि इतर सर्व घटकांच्या मागण्या मंजूर होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे काही सहकार्य करता येईल ते आपण करू, असे अभिवचन नवी मुंबई महापालिकेचे महापौर सागर नाईक यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील यांनी सिडकोमध्ये प्रकाल्प्ग्रस्तांमधील अध्यक्ष आणि संचालक असते तर प्रलंबित प्रश्न केव्हाच सुटले असते, असे प्रतिपादन केले. मागण्या मान्य केल्या नाहीत तर सिडकोमध्ये घुसू असा इशारा त्यांनी दिला. पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा विकास केला. सिडकोने प्रकल्पग्रस्तांची उपेक्षा केली तर बिल्डर मंडळींना सन्मानाची वागणूक दिल्याची टका त्यांनी केली.   रस्त्यावर परत उतरण्याची वेळ येऊ देणार नाही – पालकमंत्री नामदार गणेश नाईक सिडको, शासन आणि एमआयडीसी संबंधीच्या प्रलंबित माग्ग्न्या मान्य होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे, असे पालकमंत्री नामदार गणेश नाईक म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थीतीतही मुख्यमंत्र्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. सत्याचा आग्रह धरणे हा काही गुन्हा नाही. प्रकल्पग्रस्त आणि इतर घटकांवर आंदोलन करण्याची अशी वेळ यायला नको होती, असे सांगून नामदार नाईक म्हणाले कि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागण्या मांडून त्या तातडीने मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा करेन. नवी मुंबईत स्थायिक झालेला परप्रांतीय आणि येथील मुल रहिवासी दोन्ही घटक सन्मानाने जगले पाहिजेत, अशी आपली भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....

read more

वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे

Posted by on 5-05-14 in News | 0 comments

वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे

वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे वर्तकनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांना अखेर एमएमआरडीएच्या घरांमध्ये अखेर प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून येत्या मंगळवारी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्री ना. नाईक यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भेट घेऊन पोलिसांच्या घरांबाबत भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. ठाण्यातील वर्तकनगर पोलिस वसाहतीत धोकादायक इमारतींमध्ये ५५६ कुटुंबियांना आठ दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर येणार असल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती. ठाणे शहरातील वर्तकनगर येथे १९६० ते १९७० च्या दशकामधील म्हाडाच्या माध्यमातून बांधलेल्या पोलिस वसाहतींची अतिशय वाईट अवस्था झाली. या वसाहतीतील रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून जनतेचे रक्षण करणारे पोलिस त्यांच्या कुटुंबीयांसह या इमारतीमध्ये राहत असून कित्येक पोलिसांची तिसरी पिढी येथूनच उदयास आलेली आहे. याचबरोबर भिवंडी दंगलीमधील शहीद पोलिसांचे कुटुंबीयही या कॉलनीत वास्तव्यास असून त्यांनी आपल्या घरांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून सुद्धा अद्यापपर्यंत निर्णय घेतला गेला नसल्याने त्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. यासंदर्भात वसाहतीमधील महिलांनी आ. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा विषय तडीस नेण्याचे साकडे घातले होते. वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील महिलांनी आ. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार आ. सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.नाईक यांच्याकडे हा विषय तडीस नेण्याचे साकडे घातले होते. वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील रहिवाशांना वर्तकनगर येथील एमएमआरडीएची १६० फुटांची दोन घरे एकत्र करून किमान ३२० फुटांची घरे देण्याची मागणी केली असता पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सदर विषयी सामायिक भूमिका घेत संबंधित अधिक्षाकांसोबत पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.   Back To News…....

read more

शिळफाटा – महापे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा

Posted by on 5-05-14 in News | 0 comments

शिळफाटा – महापे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश – नुकसान ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार   नवी मुंबई महानगर पालिका परिक्षेत्रातील शिळफाटा ते महापे ( एमआयडीसी ) येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी वनखात्याच्या जमिनी बाबतचे सर्व अडसर दूर करून हा रस्ता पावसाळ्यापूर्वी टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्याचे निर्देश ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण प्रश्नांबरोबरच मुरबाड ग्रामीण भागात पडलेल्या वळव्याच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने तयार करून पुनर्वसन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वेलरासू यांना आज दिल्या.   ठाणे जिल्हा नियोजन समितीची विशेष आढावा बैठक ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी पी. वेलरासू , ठाणे जिल्ह्याचे पालकसचिव के.पी.बक्षी, राज्यमंत्री राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सारिका गायकवाड , आ. संदीप नाईक , आ. विवेकभाऊ पंडित, आ. गणपत गायकवाड, आ. रमेश म्हात्रे, आ. बालाजी किणीकर , माजी आ. रामनाथ मोते, नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागाचे अध्यक्ष, महापालिकांचे आयुक्त आणि अधिकारी वर्ग व सदस्य उपस्थित होते. आजच्या बैठकीत जिल्हा वार्षिक आणि समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित उपाय योजना विभागाचा मार्च -२०१४ चा वार्षिक खर्चाचा अहवाल , मागील बैठकीतील इतिवृत्तांताला मान्यता देणे, मान्सून पूर्व करावयाची कामे, इतर विषयांना मंजुरी देणे आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.   ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, वाडा, जव्हार अशा ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या वणव्याच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पालकमंत्री ना. नाईक यांनी ग्रामीण भागात झालेल्या नुकसानात नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगत या ठिकाणच्या नागरिकांच्या नुकसानीचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.   या बैठकीत ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून शिळफाटा ते महापे रस्त्याच्या डागडुजीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर या ठिकाणी वनविभागाची असणारी जमीन हस्तांतरित न झाल्याने सदर रस्त्याचे काम रखडल्याचे प्रशानाकडून सांगण्यात आले. आ. नाईक यांनी वनविभागाच्या विषयक असणारा अडसर दूर करून सदरचे काम युद्धपातळीवर मार्गी लावण्याची मागणी केल्यावर या ठिकाणी असणारा अडसर दूर करून येत्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. नवी मुंबईतील करावे गाव , ऐरोली व इतर जेतींचा विकास करण्यासाठी आ. संदीप नाईक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत या विषयी देखील चर्चा करण्यात आली . या बाबत येत्या पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. नाईक यांनी संगत्जीळाधीकार्यांच्या समवेत एक बैठक घेणार असल्याचे सांगितले.   सदस्य अशोक पोहेकर यांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाला ७५.५० लाख रुपये खर्चून संरक्षक कुंपण घालण्याच्या कामाचा आढावा जाणून घेत मेंट हॉस्पिटल येथे नवीन शासकीय रुग्णालय संदर्भातील बाबींचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री ना. नाईक यांनी जिल्हाधिकारी वेलरासू आणि पालकसचिव के. पी. बक्षी यांच्या माध्यमातून याची सोडवणूक करण्याकरिता मंत्रालयीन स्तरावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. शहरात इमारतीची निर्मिती होत असताना त्या बांधकाम व्यवसायिकाला सीसी देताना सर्व नियमावलीची पूर्तता केल्याचे पाहूनच सीसी प्रमाणपत्र देण्याचे सक्त आदेश यावेळी पालकमंत्री ना. नाईक यांनी दिले.   Back To...

read more

जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस

Posted by on 3-03-14 in Uncategorized | 0 comments

जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस

होळीच्या दिवशी हल्ला ; जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस   होळीच्या दिवशी तुर्भे येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेची ( वय – ६० ) व अन्य जखमींची आज पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, आरोग्य सभापती राजू शिंदे, परिवहन समिती सदस्य अन्वर शेख, परिवहन समिती सभापती मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते. या मारहाणीत जखमींमध्ये साखरबाई शीलवंत (६०), दीपक शीलवंत (२८), जगजीवन शीलवंत (३५) गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयातील ट्रामामध्ये उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या कुटुंबातील तीन लहान मुलेही जखमी झाली होती, मात्र उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. होळीच्या दिवशी सकाळी दोन लहान मुलेही जखमी झाली होती, मात्र उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. होळीच्या दिवशी सकाळी दोन लहान मुलांमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या जगजीवन शीलवंतला मारण्यासाठी शत्रुघ्न शिंदे उर्फ शत्रू यांनी १० ते २० मुलांना मारण्यासाठी आणले आणि जगजीवनला लाठी, लोखंडी रॉडने मारहाण केल्याने जगजीवनच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याच दरम्यान जगजीवनला बघायला आलेली त्याची आई साखरबाई हिला शत्रू शिंदे आणि त्याच्या मित्राने केलेल्या मारहाणीत ती जखमी झाली. या घटनेची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, सदर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. Back To...

read more

तैलचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

Posted by on 3-03-14 in gn | 0 comments

तैलचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

नानासाहेबांचे विचार जगासाठी प्रेरणादायी – ना. गणेश नाईक   डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य हे जगासाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचे मत तैलचित्र प्रदर्शन भेटी प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. धर्माधिकारी कुटुंबीयांनी केलेल्या नि:स्वार्थ सामाजिक कार्याचे तैलचित्र प्रदर्शन कळवा-ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भेट दिली. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या थोर विभूतींच्या माध्यमातून एक फार मोठा समाज घडला. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून या समाजाला उत्तम दिशा देण्याचे व नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याचे महान कार्य अविरतपणे चालत आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व धर्माधिकारी परिवारांनी केलेल्या निस्वार्थी सामाजिक कार्य तैलचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात आले आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला खासदार डॉ. संजीव गणेश नाईक, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रुपेश म्हात्रे, ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील, यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांनी सामाजिक सेवा संस्थांनी, शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. या तैलचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, प्रौढ साक्षरता, महिलांवरील अत्याचार  या बदल जनजागृती करत रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, शैक्षणिक साहित्य वाटप या धर्माधिकारी कुटुंबाने केलेल्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला...

read more

ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी निवेदन

Posted by on 3-03-14 in Activities | 0 comments

ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी निवेदन मुंबई शहरास असलेल्या नजीकतेमुळे ठाणे शहरातील नागरी विकासावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर ताण पडत असून मुंबई शहरामध्ये काम करणारे अनेक लोक ठाणे शहरात वास्तव्य करत असल्याने ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या दशकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र त्याप्रमाणात घरांचा साठा उपलब्ध होत नसल्याने ठाणे शहरात निवाऱ्याच्या गंभीर प्रश्नामुळे लोक अनधिकृत, कमी दर्जाच्या इमारतींमध्ये निवास करीत असल्याचे दिसून येते. गेल्या २-३ वर्षामध्ये अशा अनधिकृत व कमकुवत इमारती कोसळल्याने, वित्त हानीच नाही तर जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अशा इमारती या वैयक्तिक स्वरूपामध्ये नियमित विकसित होणे अवघड असल्याने समूह पुनर्निर्माण योजनेच्या (Clustar Redevelopment) माध्यमातून अश्या इमारतींनी व्याप्त भागांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या आणि शासनाच्या विचाराधीन होता.गेल्या २-३ अधिवेशनांमध्ये याबाबत सभागृहाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. या अनुषंगाने ठाणे शहरात अशी नागरी पुनर्निर्माण योजना कार्यान्वित व्हावी या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली प्रारूप नियमावली शासनाने मंजूर केली आहे. या नियमावलीतील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :- १) महानगरपालिकेकडून जुन्या इमारती व अनधिकृत बांधकामांनी व्याप्त भागासाठी नागरी नुतनीकरण आराखडा तयार करण्यात येईल व त्यापैकी कमीतकमी १ हेक्टर क्षेत्रावर समूह पुनर्निर्माण योजनेची अंमलबजावणी करता येऊ शकेल. २) सर्व अनधिकृत बांधकामे, ३० वर्षांपेक्षा जास्त वयाची अधिकृत बांधकामे आणि ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व धोकादायक इमारती व झोपडपट्ट्या यांचा अंतर्भाव नागरी पुनर्निर्माण समूह योजनेत असू शकेल. नागरी पुनर्निर्माण योजनेकरिता ४.०० किंवा पुनर्वसन करण्याच्या क्षेत्राच्या दुप्पट यापैकी जे जास्त असेल तो चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) अनुज्ञेय राहील. ३) नागरी पुनर्निर्माण योजनेमधील ४.०० पर्यंत अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) जागेवर वापरून उर्वरित अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) हस्तांतरणीय विकास हक्काच्या (TDR) स्वरुपात शहरात इतरत्र वापरता येईल. ४) निवासी प्रयोजनार्थ पुनर्वसनासाठी कमीतकमी अनुज्ञेय क्षेत्र: ३० चौ.मी. व वाणिज्यिक प्रयोजनार्थ प्रत्येक लाभार्थ्यास पूर्वी त्याच्या ताब्यात असलेल्या क्षेत्राएवढ्या क्षेत्रफळाची सदनिका अनुज्ञेय राहील. पूर्वी अधिकृत इमारतीत बांधकामात वास्तव्य करणाऱ्या लाभार्थ्यास सदर पुनर्वसन सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. मात्र पूर्वी अनधिकृत इमारतीमध्ये निवास करणाऱ्या लाभार्थीने त्याचा हिस्सा बाजारमूल्य दर (Ready Reckoner) तक्त्यानुसार बांधकाम दराच्या (Construction Cost) कमीतकमी २५ टक्के दराने व १०० चौरस मीटरपेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी बाजारमूल्य दराने भरणा करणे आवश्यक राहील. ६) नागरी पुनर्निर्माण योजनेची अंमलबजावणी ७०% भूभागाचे मालक यांनी विहित कालावधीत अर्ज केल्यास व आधारभूत अधिमुल्याचा (Base Premium) भरणा केल्यास त्यांच्या को.ऑप.हौ.सोसायटी मार्फत करता येऊ शकेल. विहित कालावधीत तसे प्रस्ताव प्राप्त झाल्यास महानगरपालिका आयुक्त जाहीर निविदा काढून विकासकाची नियुक्ती करतील. ७) नागरी पुनर्निर्माण योजनेमध्ये ४.०० चटई क्षेत्र निर्देशांकासह बहुमजली ट्रान्झीट कॅम्प बांधण्याची तरतूद संकल्पित आहे. ८) नागरी पुनर्निर्माण योजनेचा लाभ सुमारे ५.५० लक्ष लोकांना होण्याचे अपेक्षित...

read more

क्लस्टर डेवेलोपमेंट

Posted by on 3-03-14 in Activities | 0 comments

नवी मुंबई, ठाणेसाठी क्लस्टर मंजूर २०० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित होणार पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश   अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करावी याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते त्याला अखेर आज यश आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली. यासंबंधीचे निवेदन विधानसभेत करताना त्यांनी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी क्लस्टरसाठी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. २००० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. लाखो नागरिकांचे डोळे या निर्णयाकडे लागले होते. नवी मुंबई आणि ठाणेसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर करताना विधानसभेत केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी याकरिता केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आवर्जून उल्लेख केला. नवी मुंबई क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या विस्तारित घरांचा पुनर्विकास क्लस्टर विकासाच्या माध्यमातून करण्यासाठी पालकमंत्री नामदार गणेश नाईक हे सातत्याने पाठपुरावा करीत होते, असे मुख्यमंत्री चव्हाण आपल्या निवेदनात म्हणाले. कमीत कमी १८ मी. रुंद रस्त्यावर व किमान ४,००० चौ. मी. क्षेत्रावर क्लस्टर योजना राबविण्यात येईल व अशा समूह विकास भूखंडावर एकूण चटई क्षेत्र निर्देशांक जास्तीत जास्त ४.० इतका असेल.   प्रयत्नांना यश आले…. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी क्लस्टर विकासाची योजना लागू व्हावी यासाठी सातत्याने शासकीय पातळीवर अविरत पाठपुरावा केला होता. सर्व पक्षीयांनी हि योजना मंजूर व्हावी यासाठी मागणी केलेली होती. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत पालकमंत्री नाईक यांच्या पुढाकाराने धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता क्लस्टर योजना लागू करावी या संदर्भात बैठकाही झाल्या होत्या. या बैठकांमधून या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. ठाण जिल्हा नियोजन समितीच्या एका बैठकीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी पालकमंत्री नाईक यांना क्लस्टर लागू करण्यासाठी शासकीय स्तरावर पुढाकार घेण्याची विनंती केली होती.त्यानुसार पालकमंत्री नाईक यांनी याबाबतचा पाठपुरावा सुरु ठेवला आहे. क्लस्टरसाठी विविध राजकीय पक्ष्यांनी मोर्चे देखील काढले आहेत. तसेच तीव्र स्वरुपाची आंदोलनेही केलेली आहेत. ठाण्यामध्ये खासदार डॉ. संजीव गणेश नाईक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून क्लस्टरबाबतचा लवकरच निर्णय जाहीर करू असे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने खा. डॉ. नाईक यांना दिले होते. आमदार संदीप नाईक यांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान क्लस्टर लागू करणेबाबत प्रश्न विचारले होते. त्यावर लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी सभागृहात दिले होते. पालकमंत्री नाईक यांच्या पुढाकाराने २० सप्टेंबर २०१३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली होती. ठाणे जिल्ह्यातील धोकादायक, मोडकळीस आलेल्या तसेच अनधिकृत इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ठाणे, कळवा, मीरा-भाईंदर, मुंब्रा इत्यादी ठिकाणी धोकादायक इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या असून त्यामधून शंभर पेक्षाही अधिक रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भविष्यामध्ये एखादी मोठी दुर्घटना घडून रहिवाशांचे प्राण जाण्याचा धोका कायम होता. या नागरिकांच्या जीविताचे रक्षण करून त्यांना क्लस्टर विकासाच्या माध्यमातून हक्काची आणि सुरक्षित घरे मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका पालकमंत्री ना. नाईक यांनी या बैठकीत मांडली होती. त्यानुसार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले होते.   पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची प्रतिक्रिया…. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांसाठी क्लस्टर योजना मंजूर केल्याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. क्लस्टर मंजूर होण्यासाठी पालकमंत्री नामदार नाईक हे शासकीय पातळीवर २००४ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आल्याबद्दल नामदार नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे....

read more
Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube