CIDCO FSI

विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण अंगी असणा-या गणेशजींचे नेतृत्व सर्वप्रथम ठसठशीतपणे पुढे आले ते उरण येथील विद्यार्थ्यांना मिळणा-या विद्यावेतनाप्रमाणेच (स्टायपेंड) ठाणे-बेलापूर पट्टीतील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन मिळायलाच हवे यासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे. त्यांच्या जबरदस्त आंदोलनापुढे सिडको नरमली. विद्यावेतन सुरु झाले आणि गणेशजी नाईक हे नाव जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून अधोरेखीत झाले.

पुढे भूमिपुत्रांच्या न्याय व हक्कांसाठी त्यांनी कार्यालयीन कामकाजात होणारा विलंब टाळण्यासाठी से. १, वाशी येथील त्यावेळच्या सिडकोच्या मुख्य कार्यालयात जाऊन केलेले “पेन-पेन्सिल बंद” आंदोलनही यशस्वीरित्या पार पाडले. स्थानिक तरुणांची बेरोजगारी सोडविण्यासाठी बेलापूर पट्टीतील वेगवेगळ्या कंपन्यांच्या गेटवर थेट धडक देत अनेकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांनी आग्रही भूमिका बजावली. शेती-मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असलेल्या स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतला. पारंपारिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड देत काळाची पावले ओळखून नवनव्या व्यवसायक्षेत्रात स्थानिक तरुणांना कार्यप्रणव बनविले.

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube