Activities

 

श्री. गणेशजी नाईक   यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.

  • सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना त्यांनी राबविली. Read More….
  • श्री. गणेशजी नाईक  यांनी नवी मुंबई शहरातील गावठाण व गावठानाभोवती बांधलेल्या बांधकामांसाठी समूहविकास पद्धतीने नागरीपुनर्निर्माण योजनेअंतर्गत विकास करणे या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी करावयाचे निवेदन सादर केले. आणि हा प्रस्ताव शासनाकडून सिडको व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यासाठी कलम ३७(१ कक) अन्वये सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.  Read More….
  • अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करावी याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते त्याला अखेर आज यश आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली.  Read More….
  • ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी पालकमंत्री ना. गणेशजी नाईक यांनी निवेदन सादर केले. क्लस्टर डेवेलोपमेंटच्या अनुषंगाने ठाणे शहरात अशी नागरी पुनर्निर्माण योजना कार्यान्वित व्हावी या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली प्रारूप नियमावली शासनाने मंजूर केली आहे. Read More….
  • नवी मुंबईच्या नियोजित विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश . नवी मुंबईचा सिंगापूरच्या धर्तीवर नियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. Read More….
  • एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक – जनता दरबारात मानले पालकमंत्र्यांचे आभार . एनएमएमटी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू झालेला २८ कोटींचा फरक देण्यात आला नव्हता. याबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी हा फरक देण्याचे आश्वासन एनएमएमटी श्रमिक सेनेला दिले आहे. Read More….
  • आरोग्यविषयक मूलभूत सेवांतील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रथमत: ८ रुग्णवाहिकांचे वाटप केले. टप्प्याटप्प्याने ही संख्या आता ९० च्या वर पोहोचली असून गणेशजी नाईक यांच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना गतीमान आरोग्य सुविधा उपलब्ध झालेली आहे.
  • शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक मलप्रक्रिया केंद्रे, शास्त्रोक्त जमीन भरणा पद्धतीवर आधारीत कच-यापासून खतनिर्मिती व इंधननिर्मिती करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प – असे जागतिक स्वरावर नावाजले गेलेले प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने राबविले आहेत.
  • लोककल्याणकारी योजनांतून महिला, बालके, अपंग, मागासवर्गीय घटक, ज्येष्ठ नागरिक, श्रमजीवी कामगार – यांना मदतीचा हात दिला आहे. प्रशासनाला मानवी चेहरा प्रदान करण्याची भूमिका गणेशजींनी नेहमीच मार्गदर्शक म्हणून ठसठशीतपणे मांडली आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत.

 

 

gnaiknew

clustar

ganeshji

ganeshjinaik

janatadarbar

 

 

 

 

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter