Activities
श्री. गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
- सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना त्यांनी राबविली. Read More….
- श्री. गणेशजी नाईक यांनी नवी मुंबई शहरातील गावठाण व गावठानाभोवती बांधलेल्या बांधकामांसाठी समूहविकास पद्धतीने नागरीपुनर्निर्माण योजनेअंतर्गत विकास करणे या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी करावयाचे निवेदन सादर केले. आणि हा प्रस्ताव शासनाकडून सिडको व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करण्यासाठी कलम ३७(१ कक) अन्वये सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. Read More….
- अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करावी याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते त्याला अखेर आज यश आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली. Read More….
- ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी पालकमंत्री ना. गणेशजी नाईक यांनी निवेदन सादर केले. क्लस्टर डेवेलोपमेंटच्या अनुषंगाने ठाणे शहरात अशी नागरी पुनर्निर्माण योजना कार्यान्वित व्हावी या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली प्रारूप नियमावली शासनाने मंजूर केली आहे. Read More….
- नवी मुंबईच्या नियोजित विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश . नवी मुंबईचा सिंगापूरच्या धर्तीवर नियोजित विकास करण्यासाठी एमएमआरडीए, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, एमआयडीसी आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. Read More….
- एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाचा फरक – जनता दरबारात मानले पालकमंत्र्यांचे आभार . एनएमएमटी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू झालेला २८ कोटींचा फरक देण्यात आला नव्हता. याबाबत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी हा फरक देण्याचे आश्वासन एनएमएमटी श्रमिक सेनेला दिले आहे. Read More….
- आरोग्यविषयक मूलभूत सेवांतील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रथमत: ८ रुग्णवाहिकांचे वाटप केले. टप्प्याटप्प्याने ही संख्या आता ९० च्या वर पोहोचली असून गणेशजी नाईक यांच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना गतीमान आरोग्य सुविधा उपलब्ध झालेली आहे.
- शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक मलप्रक्रिया केंद्रे, शास्त्रोक्त जमीन भरणा पद्धतीवर आधारीत कच-यापासून खतनिर्मिती व इंधननिर्मिती करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प – असे जागतिक स्वरावर नावाजले गेलेले प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने राबविले आहेत.
- लोककल्याणकारी योजनांतून महिला, बालके, अपंग, मागासवर्गीय घटक, ज्येष्ठ नागरिक, श्रमजीवी कामगार – यांना मदतीचा हात दिला आहे. प्रशासनाला मानवी चेहरा प्रदान करण्याची भूमिका गणेशजींनी नेहमीच मार्गदर्शक म्हणून ठसठशीतपणे मांडली आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत.
मेगा जॉब फेअर २०१४
‘ जीवनधारा ‘च्या विनामूल्य ‘ मेगा जॉब फेअर ‘ चा ८००० उमेदवारांना लाभ २३८७ उमेदवारांना मिळाल्या नोकऱ्या युवा पिढीचे भवितव्य उज्वल करणारा रोजगार मेळावा – पालकमंत्री ना. गणेश नाईक नवी मुंबई शहर आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या वाट खुल्या करून देण्यासाठी ‘ जीवनधारा ‘ च्या रोजगार विभागाने मागील तीन वर्षात यशस्वीपणे प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला काम देण्याचे सामर्थ्य ‘ जीवनधारा’ त आहे. वर्तमानाला बळ देऊन युवा वर्गाचे भवितव्य उज्वल करणारा हा ‘ मेगा जॉब फेअर ‘चा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. पालकमंत्री ना....
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४
‘जीवनधारा’ प्रस्तुत ‘आंतरराष्ट्रीय पतंग’ महोत्सवाची यशस्वी भरारी नवी मुंबई | प्रतिनिधी ‘जीवनधारा’ प्रस्तुत पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४’ मध्ये आज नवी मुंबईकर संस्कृतीप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कोपरखैरणे चे निसर्ग उद्यान सकाळी ९ वाजेपासून अबालवृद्ध नागरिकांनी फुलून गेले होते. या महोत्सवाचे न केवळ नवी मुंबईकरांनी कौतुक केले तर देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशी पाहुण्यांनी देखील अभिनंदन केले. नवी मुंबईचे कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक विश्व आपल्या विविध उपक्रमांनी समृद्ध करणाऱ्या नवी मुंबई कला संकुल, नवी मुंबई क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद या...
मॅरेथॉन २०१४
नवी मुंबई धावली…! मॅरेथॉन २०१४ ला विक्रमी प्रतिसाद शशिकांत डांगे, हर्षली पस्पे खुल्या गटात विजेते नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद लाभला. खेळाडूंसह सर्व स्तरातील आणि वयोगटातील ७ हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर या स्पर्धेत धावले आणि आपल्या सामाजिक जाणीवा घट्ट असल्याचे दाखवून दिले. जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवामधील आजची ही मॅरेथॉन स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली.८ किलोमीटरच्या खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात शशिकांत डांगे याने तर महिलांच्या गटात हर्षली पस्पे यांनी विजय प्राप्त केला.स्पर्धेसाठी खास...
Navi Mumbai Krida Sankul
नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार २२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे काढले. आजच्या युवा पिढीला चांगल्या विचारांच्या प्रवाहात आणण्याची नितांत गरज आहे. जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने आयोजित क्रीडा महोत्सव २०१४ हा क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा ठरला आहे, असे गृहमंत्री पाटील म्हणाले. जीवनधारा...
Sarav Pariksha
Navi Mumbai perhaps is the only city in the state where SSC boards students get to appear for mock board examinations conducted exactly on the lines of the boards conducted by the state. The initiative is becoming so popular with every passing year that 15000 students wrote the mock examinations this year. And the toppers were in for a surprise as MLA Sandeep Naik himself who went to the homes of the toppers to felicitate them. Smiles, excitement and jubilation electrified the homes of the toppers of the...
Dakhale Vatap
The one day free camp organized on May 3, by Navi Mumbai Shikshan Sankul in association with the Thane Tahsildar office to issue various certificates that are required for admissions in colleges, for jobs and businesses and official work has the year too been a grand success. Around fifteen thousand residents reportedly benefitted from the camp held at R.F. Naik College in Kopar Khairane. State minister Ganeshji Naik who inaugurated the camp appreciated the holding of the camp saying it helps gives the...
Job Fair
The job fair was organized through the Navi Mumbai Ward Consultant Committee (employment, trade and industry) formed by State and Guardian minister Ganesh Naik under his Jeevandhara concept for the city. It was organized in association with ‘Manipal Global Education Services’ Irize employment-self employment centre. The job fair held at Hegade Bhavan in sector 15 fo Airoli was inaugurated by Ganesh Naik. It Started at 10 am and continued well into the evening . 50 well known reputed companies set up their stalls at the fair. Following the registration...
Navi Mumbai Shikshan Sankul
नवी मुंबई शिक्षण संकुल : “नवी मुंबई शिक्षण संकुल” दरवर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेसारखीच “एस.एस.सी.सराव परीक्षा” आयोजित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वास देते व गुणवंतांचे पारितोषिक देऊन कौतुक करते. विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण अंगी असणा-या गणेशजींचे नेतृत्व सर्वप्रथम ठसठशीतपणे पुढे आले ते उरण येथील विद्यार्थ्यांना मिळणा-या विद्यावेतनाप्रमाणेच (स्टायपेंड) ठाणे-बेलापूर पट्टीतील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन मिळायलाच हवे यासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे. त्यांच्या जबरदस्त आंदोलनापुढे सिडको नरमली. विद्यावेतन सुरु झाले आणि गणेशजी नाईक हे नाव जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून अधोरेखीत झाले. Navi Mumbai Shikshan Sankul : With the aim of encouraging students for their performance...
Green Hope
ग्रीन होप : १९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. “ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, खारफुटींचे रोपण-संवर्धन कार्यक्रम पर्यावरणविषयक जाणीव जागृती करीत राबविले जातात. शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक...