Personal Details
श्री. गणेशजी नाईक :
जनसामान्यांना आपलेसे वाटणारे राजकीय नेते, कार्यक्षम मंत्री, दूरदृष्टीचे विकासपुरुष, सर्वधर्मसमभावाचे प्रवक्ते, प्रगल्भ समाजसुधारक, सर्वांना सोबत घेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे लोकनेते – अशा अनेक प्रकारे श्री. गणेशजी नाईक यांचे व्यक्तिमत्व जनसामान्यांत लोकप्रिय आहे.
सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखमय व्हावे हा मुख्य उद्देश नजरेसमोर ठेवून कार्यरत असलेली त्यांची विचारप्रणाली थेट माणुसकीशी नाते जोडणारी आहे, मानवताधर्माची जपणुक करणारी आहे, विकासाच्या मार्गाने घेऊन जाणारी आहे.
ठाणे जिल्ह्यातील, ठाणे-बेलापूर पट्टीमधील खैरणे-बोनकोडे गांवात १५ सप्टेंबर १९५० रोजी जनमान्यता लाभलेल्या ‘नाईक’ कुटुंबात गणेशजींचा जन्म झाला. पुढे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने लोकमान्यतेसोबत राजमान्यताही मिळविली.
आज स्वत: गणेशजी नाईक हे बेलापूर मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री, मोठे सुपुत्र डॉ.संजीव हे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, धाकटे सुपुत्र श्री.संदीप हे ऐरोली मतदारसंघाचे आमदार, पुतणे श्री.सागर हे नवी मुंबईचे महापौर – अशाप्रकारे इतका व्यापक जनाधार व लोकप्रेम लाभलेले “नाईक” घराणे गणेशजींच्या सर्वसमावेशक कार्यप्रणालीमुळे नेहमीच लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेले दिसून येते.
एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करणे आणि आपल्या मनाला पटलेल्या योग्य गोष्टींवर धाडसाने निर्णय घेणे ही त्यांची खासियत राहिलेली आहे. त्यातूनच नवी मुंबईच्या एकात्मिक विकासाच्या नियोजनाची अर्थात “वन टाईम प्लानिंग” ची अभिनव संकल्पना साकारली जात आहे. यामधून शहराला जागतिक स्तराच्या सुविधांनी परिपूर्ण करण्याचे नियोजन आहे.
‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून ते जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
सामाजिक कार्यकर्ता, कामगार नेता ते कॅबिनेट मंत्री – हा गणेशजी नाईक यांचा प्रवास नेहमीच सर्वसामान्य माणसाचे हित नजरेसमोर ठेवून विकासाला प्राधान्य देणारा राहिला आहे, म्हणूनच त्यांच्या भोवतालची माणसांची गर्दी नेहमीच वाढत राहिलेली दिसून येते. त्यांच्या कार्याची हीच पोच पावती आहे आणि हीच त्यांच्या कृतीशीलतेमागील ऊर्जा आहे.
Ganeshji Naik Bio-data