Janata Darbar
जनता दरबार :
सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य हादेखील एक विक्रमच ठरावा.
‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून गणेशजी नाईक जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
“जनता दरबार” ची व्याप्ती अधिक वाढवत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी दरबाराचे आयोजन केले जाऊ लागले. “सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री” ही जनसामान्यांच्या मनातील भावना अधिक दृढ झाली. जनता दरबाराचेही स्वरुप बदलत त्यांनी “उद्याचे काम आज करा, आणि आजचे काम आत्ताच करा” हे ब्रीदवाक्य धारण करीत तत्पर आणि कृतीशील कार्यपद्धतीवर भर दिलेला दिसून येते.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार
वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून नवी मुंबईला सिंगापूर, दुबईचे रूप देणार पालकमंत्री ना.गणेश नाईक यांचा निर्धार पहिल्या प्रभाग बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद निवेदनांवर कार्यवाहीचा आढावा प्रभाग बैठकीत प्रभागातील रहिवाशांनी त्यांच्या समस्यांची निवेदने बैठकस्थळी ठेवण्यात आलेल्या तक्रारपेटीत टाकली. हि निवेदने संबंधित विभागाला पाठविण्यात येणार आहेत. निवेदनकर्त्या व्यक्तीने दिलेल्या निवेदनांवर काय कार्यवाही झाली याचा आढावा जनता दरबारात घेण्यात येणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर रेल्वे रुळांच्या दुतर्फा संरक्षक भिंत बांधण्याची सूचना सिडकोला केली आहे, यामुळे रेल्वेरुळांवर होणारे अपघात टळतील असे पालकमंत्री ना.गणेश नाईक म्हणाले. नवी मुंबई | प्रतिनिधी वन टाईम प्लानिंगच्या माध्यमातून आगामी...
नवी मुंबई धावली !…
नवी मुंबई धावली…! मॅरेथॉन २०१४ ला विक्रमी प्रतिसाद शशिकांत डांगे, हर्षली पस्पे खुल्या गटात विजेते नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद लाभला. खेळाडूंसह सर्व स्तरातील आणि वयोगटातील ७ हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर या स्पर्धेत धावले आणि आपल्या सामाजिक जाणीवा घट्ट असल्याचे दाखवून दिले. जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवामधील आजची ही मॅरेथॉन स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली.८ किलोमीटरच्या खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात शशिकांत डांगे याने तर महिलांच्या गटात हर्षली पस्पे यांनी विजय प्राप्त...
मॅरेथॉन २०१४
नवी मुंबई धावली…! मॅरेथॉन २०१४ ला विक्रमी प्रतिसाद शशिकांत डांगे, हर्षली पस्पे खुल्या गटात विजेते नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद लाभला. खेळाडूंसह सर्व स्तरातील आणि वयोगटातील ७ हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर या स्पर्धेत धावले आणि आपल्या सामाजिक जाणीवा घट्ट असल्याचे दाखवून दिले. जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवामधील आजची ही मॅरेथॉन स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली.८ किलोमीटरच्या खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात शशिकांत डांगे याने तर महिलांच्या गटात हर्षली पस्पे यांनी विजय प्राप्त केला.स्पर्धेसाठी खास...
Navi Mumbai Krida Sankul
नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार २२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे काढले. आजच्या युवा पिढीला चांगल्या विचारांच्या प्रवाहात आणण्याची नितांत गरज आहे. जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने आयोजित क्रीडा महोत्सव २०१४ हा क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा ठरला आहे, असे गृहमंत्री पाटील म्हणाले. जीवनधारा...
नवी मुंबई क्रीडा महोत्सव २०१४
नवी मुंबई क्रीडा महोत्सव क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे गौरवोद्गार २२ व्या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबईने सायबर नगरी बरोबरच संस्कृती कला आणि परंपरेचा त्रिवेणी संगम साधणारी एक सांस्कृतिक नगरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे काढले. आजच्या युवा पिढीला चांगल्या विचारांच्या प्रवाहात आणण्याची नितांत गरज आहे. जीवनधारा वार्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्यावतीने आयोजित क्रीडा महोत्सव २०१४ हा क्रीडा संस्कृतीची जोपासना करणारा ठरला आहे, असे गृहमंत्री पाटील म्हणाले. जीवनधारा...