Janata Darbar
जनता दरबार :
सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य हादेखील एक विक्रमच ठरावा.
‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून गणेशजी नाईक जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
“जनता दरबार” ची व्याप्ती अधिक वाढवत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी दरबाराचे आयोजन केले जाऊ लागले. “सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री” ही जनसामान्यांच्या मनातील भावना अधिक दृढ झाली. जनता दरबाराचेही स्वरुप बदलत त्यांनी “उद्याचे काम आज करा, आणि आजचे काम आत्ताच करा” हे ब्रीदवाक्य धारण करीत तत्पर आणि कृतीशील कार्यपद्धतीवर भर दिलेला दिसून येते.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
पुनर्बांधणीला मंजुरी मिळवून देणारच
नवी मुंबईच्या विकासाकरिता पुनर्बांधणीला मंजुरी मिळवून देणारच ‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ उपक्रमात ना. गणेश नाईक यांचा विश्वास नवी मुंबई शहरात एकत्रित विकास योजना राबवल्यानंतरही नागरिकांच्या एका पैशाचीही वाढ होणार नसल्याची ग्वाही देतानाच शहर विकासाकरिता पुनर्बांधणीला आपण मंजुरी मिळवून देणारच असा ठाम विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी येथे दिला. पालकमंत्री प्रभागनिहाय बैठकांची मालिका सुरु असून त्याअंतर्गत आज ना. नाईक यांचा ‘ पालकमंत्री आपल्या प्रभागात ‘ या संकल्पनेच्या माध्यमातून विविध प्रभागांना भेटी देण्याचा उपक्रम सुरु असून आज वाशी येथील प्रभाग ५३ च्या भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या...
जनप्रतिनिधींचा दरबार
एमएमआरडीए बांधणार आठ नवे उड्डाणपूल ऐरोली- कल्याणला जोडणारा नवा भुयारीमार्ग सिडकोतर्फे उर्वरित सुविधा भूखंडांचे पालिकेला लवकरच होणार हस्तांतरण नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई शहरातील महत्वाच्या नागरी समस्या व विकासकामांच्या अनुषंगाने पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचा आज वाशी येथे विशेष जनप्रतिनिधी दरबार यशस्वीपणे पार पडला. या जनप्रतिनिधींच्या दरबारात शासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. एनएमआरडीएचे आयुक्त यु.पी. एस मदान यांनी नवी मुंबईत एमएमआरडीए मार्फत ८ नवे उड्डाणपूल उभारले जाणार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय ऐरोली येथील डोंगरातून ऐरोली व कल्याण यांना जोडणारा नवा भुयारी मार्ग प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली....
सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या पुढाकाराने ‘पंचरत्न’ मधील सिलिंडर स्फोटबाधित कुटुंबांना निवारा नवी मुंबई प्रतिनिधी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या पुढाकारामुळे नेरूळच्या पंचरत्न सोसायटीमधील गस सिलिंडर बाधित कुटुंबांना सिडकोने त्यांच्या उलवे येथील उन्नती या गृहनिर्माण प्रकल्पात निवारा देण्याचे मान्य केले आहे. गुरुवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या जनप्रतीनिधींच्या विशेष दरबारात नाईक यांनी हा विषयउपस्थित करून या इमारतीमधील रहिवाशांना निवारा देण्याचे सिडकोकडून मान्य करून घेतले. नेरूळच्या सेक्टर-१६ मध्ये असलेल्या पंचरत्न या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रवींद्र तोंडवळकर यांच्या घरात सिलिंडरचा भीषण स्फोट 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी...
ऐरोलीत इको वॉक जॉगिंग पार्क
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवद्गार – आ. संदीप नाईक यांच्या आमदार निधीला अभिनव उपक्रम नवी मुंबई | प्रतिनिधी ऐरोली येथील लोकप्रतिनिधी, सुज्ञ नागरिक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी आ. संदीप नाईक यांच्याकडे सुंदर असे पर्यावरणाला समर्पक असे इको वॉक जॉगिंग पार्क उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपल्या आमदार विकास निधी अंतर्गत या ठिकाणी नागरिकांच्या करिता जॉगिंग ट्रेकरुपी नंदनवन फुलविले आहे. लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य जनता व लोकप्रतिनिधीचे प्रतिक म्हणजे हा इको वॉक जॉगिंग पार्क आहे, असे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी आज ऐरोली येथे काढले....
मिनी इनडोअर स्टेडीयमचे लोकार्पण
केंद्रीय कृषीमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते ढोकाळीतील आंतरराष्ट्रीय मिनी इनडोअर स्टेडिअमचे आज लोकार्पण रुणवाल गार्डन येथील तरुण तलावाचे भूमिपूजन नवी मुंबई प्रतिनिधी खा. डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या खासदार विकास निधीतून आणि ठामपाच्या निधीतून ढोकाळी येथे ठाण्यातले पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिनी इनडोअर स्टेडियम साकारले आहे. ठाणे शहरासाठी भुषनावह असलेल्या या स्टेडियमचे उद्घाटन उद्या ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळ ५.३० वाजता ढोकाळी नाका, कोलशेत रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी केंद्रीय कृषीमंत्री आणि कुशल क्रीडा संघटक नामदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याच बरोबर रुणवाल गार्डन येथील तरण तलावाच्या कामाचा...
मेट्रो रेल्वेसाठी कार्यवाही करा
ठाण्यात मेट्रो रेल्वे ; तातडीने कार्यवाही करा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई | प्रतिनिधी ठाणे शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो रेल्वे सुरु करण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी आज संबंधितांना विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीस ठाण्यातील आमदार तसेच आ. गणपत गायकवाड, कामगार नेते अशोक पोहेकर आदी उपस्थित होते. सदर कामा-बाबतची कार्यवाही जलदगतीने मार्गी लागण्यासाठी लवकरच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ना. नाईक यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामे होऊ...
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४
‘जीवनधारा’ प्रस्तुत ‘आंतरराष्ट्रीय पतंग’ महोत्सवाची यशस्वी भरारी नवी मुंबई | प्रतिनिधी ‘जीवनधारा’ प्रस्तुत पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४’ मध्ये आज नवी मुंबईकर संस्कृतीप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कोपरखैरणे चे निसर्ग उद्यान सकाळी ९ वाजेपासून अबालवृद्ध नागरिकांनी फुलून गेले होते. या महोत्सवाचे न केवळ नवी मुंबईकरांनी कौतुक केले तर देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशी पाहुण्यांनी देखील अभिनंदन केले. नवी मुंबईचे कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक विश्व आपल्या विविध उपक्रमांनी समृद्ध करणाऱ्या नवी मुंबई कला संकुल, नवी मुंबई क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद या...
जल्लोषाच्या मांज्याला आनंदाचे पतंग !
‘जीवनधारा’ प्रस्तुत ‘आंतरराष्ट्रीय पतंग’ महोत्सवाची यशस्वी भरारी नवी मुंबई | प्रतिनिधी ‘जीवनधारा’ प्रस्तुत पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१४’ मध्ये आज नवी मुंबईकर संस्कृतीप्रेमींनी पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. कोपरखैरणे चे निसर्ग उद्यान सकाळी ९ वाजेपासून अबालवृद्ध नागरिकांनी फुलून गेले होते. या महोत्सवाचे न केवळ नवी मुंबईकरांनी कौतुक केले तर देशाच्या विविध भागातून आलेल्या तसेच परदेशी पाहुण्यांनी देखील अभिनंदन केले. नवी मुंबईचे कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक विश्व आपल्या विविध उपक्रमांनी समृद्ध करणाऱ्या नवी मुंबई कला संकुल, नवी मुंबई क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद या...
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’
‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३’ चा शुभारंभ ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांची माहिती; ठाणे जिल्ह्यात योजनेचे १० लाख लाभार्थी नवी मुंबई | प्रतिनिधी भूक आणि कुपोषण निर्मूलनाचे उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ‘ मंजूर केले. महाराष्ट्र राज्यस्तरावर ‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ‘ कार्यान्वित करण्याचा शुभारंभ, दि.३१ जानेवारी रोजी ऐरोली नॉलेज पार्क पटनी कंपनी समोरील मैदानात पार पडणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री ना. शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चावण आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा...
ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी
ठाणे जिल्यातील विकासकामांकरिता मिळणार अतिरिक्त निधी मुंबई | प्रतिनिधी मंत्रालयात आज झालेल्या २०१४ -२०१५ च्या ठाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय सर्वसाधारण बैठकीत पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मागणी केल्याने जिल्यातील विविध विकासकामांसाठी अतिरिक्त निधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये ८४ कोटी ३० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याबाबत अर्थमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीला जिल्हाधिकारी पी वेलरासू आणि विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा सार्वजनिक कार्यान्वयीन यंत्रणांसाठी २७९ कोटी ६४ लाख रुपयांची खर्चाची मर्यादा आहे. मात्र बैठकीत...