Janata Darbar
जनता दरबार :
सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य हादेखील एक विक्रमच ठरावा.
‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून गणेशजी नाईक जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
“जनता दरबार” ची व्याप्ती अधिक वाढवत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी दरबाराचे आयोजन केले जाऊ लागले. “सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री” ही जनसामान्यांच्या मनातील भावना अधिक दृढ झाली. जनता दरबाराचेही स्वरुप बदलत त्यांनी “उद्याचे काम आज करा, आणि आजचे काम आत्ताच करा” हे ब्रीदवाक्य धारण करीत तत्पर आणि कृतीशील कार्यपद्धतीवर भर दिलेला दिसून येते.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
धनगर समाजाच्या मागण्यांची पूर्तता करणार
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अभिवचन नवी मुंबईतील धनगर समाज प्रतिष्ठान आणि मल्हार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी, १२ वी, पदवीधर तसेच एमपीएससी व युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि यशासाठी योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नेरूळ येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. गणेश नाईक यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता आपण करू, असे अभिवचन दिले. सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. त्यानंतर १० वी, १२ वी आणि एमपीएससी व युपीएससी पदवीमध्ये...
स्त्रीभृणहत्या रोखण्यात नवी मुंबईच्या नागरिकांची महत्वपूर्ण कामगिरी
जनता दरबारात पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवोद्गार नवी मुंबईच्या नागरिकांनी स्त्रीभृणहत्या रोखण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली म्हणूनच नवी मुंबई महापालिकेला सन्मान प्राप्त झाल्याची भावना पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केली. वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार पार पडला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका, सिडको, पोलीस प्रशासनाचे अधिकारी वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने स्त्रीभृणहत्या मोहीम जोरदारपणे राबवून दुसरा क्रमांक पटकावला. या संदर्भाने पालकमंत्री ना.नाईक यांच्याहस्ते आरोग्य अधिकारी डॉ....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करा
पालकमंत्री ना.गणेश नाईक यांची पालिका अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व घटकांना अंतिम मुदत पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर- १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या लोकाभिमुख आणि शहराला भूषणावह ठरणाऱ्या वास्तूची उभारणी करण्यात काही तांत्रिक बाबींमुळे विलंब होतो आहे, हि वस्तुस्थिती आहे. या भवनाचे काम करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित घटकांनी या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर हाती घेऊन डॉ. आंबेडकर महपरिनिर्वाण दिन म्हणजेच ६ डिसेंबर २०१४ पर्यंत ते पूर्ण करण्याचे सक्त निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी...
महामोर्चाने हादरली सिडको !
मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन होणार आणखी तीव्र प्रकल्पग्रस्तांच्या घरांना हात लावाल तर खबरदार – आ. संदीप नाईक. आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबईतील गाव – गावठाणातील प्रकल्पग्रस्त नागरिक , सिद्कोनिर्मित धोकादायक इमारतींमधून राहणारे रहिवासी, झोपडपट्टीवासीय, रेल्वे प्रकल्पग्रस्त नागरिक, माथाडी, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त, बीएमटीसी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आज सिडको महामंडळ आणि कोकण भवन कार्यालयावर महामोर्चा नेला. या महामोर्चात सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाले होते. या प्रचंड महामोर्चाने सिडको प्रशासन आणि शासन हादरले असून वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्या जर तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र...
वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे
वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे वर्तकनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांना अखेर एमएमआरडीएच्या घरांमध्ये अखेर प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून येत्या मंगळवारी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्री ना. नाईक यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भेट घेऊन पोलिसांच्या घरांबाबत भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. ठाण्यातील वर्तकनगर पोलिस वसाहतीत धोकादायक इमारतींमध्ये ५५६ कुटुंबियांना आठ दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर येणार असल्याने त्यांच्यात...
शिळफाटा – महापे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश – नुकसान ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार नवी मुंबई महानगर पालिका परिक्षेत्रातील शिळफाटा ते महापे ( एमआयडीसी ) येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी वनखात्याच्या जमिनी बाबतचे सर्व अडसर दूर करून हा रस्ता पावसाळ्यापूर्वी टप्प्या टप्प्याने मार्गी लावण्याचे निर्देश ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण प्रश्नांबरोबरच मुरबाड ग्रामीण भागात पडलेल्या वळव्याच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने तयार करून पुनर्वसन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वेलरासू यांना...
जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस
होळीच्या दिवशी हल्ला ; जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस होळीच्या दिवशी तुर्भे येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेची ( वय – ६० ) व अन्य जखमींची आज पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, आरोग्य सभापती राजू शिंदे, परिवहन समिती सदस्य अन्वर शेख, परिवहन समिती सभापती मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते. या मारहाणीत जखमींमध्ये साखरबाई शीलवंत (६०), दीपक शीलवंत (२८), जगजीवन शीलवंत (३५) गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयातील ट्रामामध्ये उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या...
तैलचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
नानासाहेबांचे विचार जगासाठी प्रेरणादायी – ना. गणेश नाईक डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले कार्य हे जगासाठी प्रेरणादायी व भूषणावह असल्याचे मत तैलचित्र प्रदर्शन भेटी प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. धर्माधिकारी कुटुंबीयांनी केलेल्या नि:स्वार्थ सामाजिक कार्याचे तैलचित्र प्रदर्शन कळवा-ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या तैलचित्र प्रदर्शनाला आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भेट दिली. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी या थोर विभूतींच्या माध्यमातून एक फार मोठा समाज घडला. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून या समाजाला...
ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी निवेदन
ठाणे शहरात नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्याविषयी निवेदन मुंबई शहरास असलेल्या नजीकतेमुळे ठाणे शहरातील नागरी विकासावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर ताण पडत असून मुंबई शहरामध्ये काम करणारे अनेक लोक ठाणे शहरात वास्तव्य करत असल्याने ठाणे शहराची लोकसंख्या गेल्या दशकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र त्याप्रमाणात घरांचा साठा उपलब्ध होत नसल्याने ठाणे शहरात निवाऱ्याच्या गंभीर प्रश्नामुळे लोक अनधिकृत, कमी दर्जाच्या इमारतींमध्ये निवास करीत असल्याचे दिसून येते. गेल्या २-३ वर्षामध्ये अशा अनधिकृत व कमकुवत इमारती कोसळल्याने, वित्त हानीच नाही तर जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अशा इमारती या वैयक्तिक स्वरूपामध्ये...
क्लस्टर डेवेलोपमेंट
नवी मुंबई, ठाणेसाठी क्लस्टर मंजूर २०० सालापर्यंतच्या झोपड्या नियमित होणार पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश अनधिकृत तसेच धोकादायक इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या लाखो रहिवाशांना सुरक्षित आणि हक्काची घरे मिळण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर करावी याकरिता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते त्याला अखेर आज यश आले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ठाणे आणि नवी मुंबईसाठी क्लस्टर विकास योजना मंजूर केल्याची घोषणा केली. यासंबंधीचे निवेदन विधानसभेत करताना त्यांनी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी क्लस्टरसाठी केलेल्या...