Janata Darbar
जनता दरबार :
सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य हादेखील एक विक्रमच ठरावा.
‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून गणेशजी नाईक जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
“जनता दरबार” ची व्याप्ती अधिक वाढवत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी दरबाराचे आयोजन केले जाऊ लागले. “सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री” ही जनसामान्यांच्या मनातील भावना अधिक दृढ झाली. जनता दरबाराचेही स्वरुप बदलत त्यांनी “उद्याचे काम आज करा, आणि आजचे काम आत्ताच करा” हे ब्रीदवाक्य धारण करीत तत्पर आणि कृतीशील कार्यपद्धतीवर भर दिलेला दिसून येते.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
नागरिकांच्या सोयीकरिता नेरूळ माता बाल रुग्णालय बाह्य रुग्ण सेवा कार्यान्वित
रुग्णालय संख्या वाढ अभिनंदनीय – ना. गणेश नाईक नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन रुग्णालय संख्येत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय व त्याची केलेली अंमलबजावणी अभिनंदनास पात्र आहे, असे मत राज्याचे नवीन व नविकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले. नेरूळ से. १५ येथील मॉंंसाहेब मीनाताई ठाकरे माताबाल रुग्णालय येथे बाह्य रुग्ण सेवा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मंत्री महोदयासमवेत महापौर सागर नाईक, उप महापौर अशोक गावडे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह...
9,500 NMMC workers to be made permanent
9,500 NMMC workers to be made permanent – The general body of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) on Friday unanimously approved a resolution to employ around 9,500 contract workers working in its various departments on a permanant basis. “The contract workers in the city are provided facilities such as provident fund, bonus, gratuity on par with permanent staff. There is however a constant fear amongst them that they could be sacked by a new contractor ” – Guardian Minister Ganesh Naik. Back To...
महावितरणने आपली यंत्रणा अपडेट करावी
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश नवी मुंबईकरांना महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी जीर्णावस्थेतील विद्युत पोल, उघड्या डीपी, खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याची महावितरणाने तात्काळ दाखल घेऊन नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील, तसेच एमआयडीसी परिसरातील विद्युत विभागाच्या समस्यांची सोडवणूक करावी. त्यासाठी महावितरणाने आपली स्वतंत्र यंत्रणा अपडेट करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पालकमंत्री ना. नाईक यांचा जनता दरबार पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र...
नवी मुंबईकरांना मिळणार लवकरच २४ तास गॅस सेवा
आ. संदीप नाईक यांची मागणी लवकरच पूर्ण होणार महानगर गॅस कंपनीने आठ दिवसांत सर्व्हे करावा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे बैठकीत निर्देश नवी मुंबई शहरातील विविध ठिकाणी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने नवी मुंबईतील नागरिकांकरिता गॅस लाईन टाकून सुविधा देण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना.नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने येत्या आठ दिवसात शहरात गॅस पाईप लाईन टाकण्यासंदर्भात सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. नाईक यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत...
पालिकेतील कंत्राटी कामगार कायम होणार
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश महापालिकेच्या आगामी महासभेत ठराव येणार सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल नवी मुंबई महापालिकेतील विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या आणि विविध ठेकेदारांमार्फत पालिकेच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ९५०० विविध संवर्गातील कामगारांसाठी शुभवर्तमान असून या कामगारांना कायम करण्याचा ठराव पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या निर्देशानुसार ८ ऑगस्ट २०१४ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. पालकमंत्री नामदार नाईक यांनी पालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, महापौर सागर नाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्वाची बैठक घेऊन या कामगारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले...
आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे आवाहन बोनकोडेतील पहिल्या महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ मागील केंद्रातील युपीए सरकारने तसेच राज्यातील विद्यमान आघाडी सरकारने लोकहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्यदायी योजना, युपीए सरकारची अन्नसुरक्षा योजना या सर्वसामान्यांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागील ५ वर्षांतील राज्यातील आघाडी सरकारचे काम कौतुकास्पद असून शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व ज्येष्ठ समाजसेवक मुकुंद नाईक यांच्या पुढाकाराने बोनकोडे येथील शिवशक्ती कार्यालयासमोरील कै. बी.एफ. नाईक निवास येथे पालकमंत्री ना.नाईक यांच्याहस्ते महा...
कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व सर्वसामान्य नागरिकांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक थांबावी त्याच बरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्रदान व्हावा यासाठी डीम्ड कन्व्हेयन्सची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली होती. त्यासाठी डॉ. संजीव गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर देखील पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे आता नवी मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आपला मालकी हक्क मिळणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीडची (भाडे...
रमजान एकात्मतेची शिकवण देणारा सण
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन नवी मुंबई शहरात मुस्लिम, शीख, जैन आणि हिंदू समाज बांधव एक दिलाने वास्तव्यास आहेत. सर्वच समाज बांधव आपापल्या परीने धार्मिक सण साजरे करतात. मुस्लिम बांधवांनी नवी मुंबईला, समानतेची जोड दिली आहे. किंबहुना आपल्या भगवंताने दिलेला सामाजिक एकात्मतेचा संदेश समाजात रुजवीत रमजान सणाच्या इफ्तार पार्टीतून एकात्मतेची शिकवण दिली आहे, असे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी काढले. जीवनधारा आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील अॅबोट हॉटेलमध्ये रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख...
नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीयांकडून सन्मान
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला ठाणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाच वर्षात अविरतपणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पार पडल्या. पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जिल्ह्यातील ७ महानगरपालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायती करिता दूरदृष्टी विकासाचे नियोजन करत नवनवीन योजना राबविल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. २५ जूलैला झालेल्या शेवटच्या नियोजन समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय खासदार, आमदार आणि सदस्यांनी पालकमंत्री ना. नाईक यांचे आभार मानले. जिल्ह्याच्या नियोजनाबाबत सर्वांगीण विकासाची भूमिका मांडणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्यातील एकमेव...
पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत
पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत नगरसेविका रेखा म्हात्रे यांचा पाठपुरावा सफाई कामगारांना पगारवाढ तीन प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरी करावे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळावी, यासाठी स्थानिक नगरसेविका रेखा विनोद म्हात्रे व प्रभाग क्रमांक ८९ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष विनोद म्हात्रे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून पोद्दार प्रशासनाने प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचे मान्य केले असून शाळेतील कामगारांना भरघोस पगारवाढही दिली आहे. पालकमंत्र्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे करावे गावातील नागरिकांनी त्यांचे...