डीम्ड कन्व्हेयन्स करणे आता झाले सोपे
Posted in News on Aug 22, 2014
- मार्गदर्शन मेळाव्याला सोसायट्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- सिडकोची नवी यंत्रणा
नवी मुंबईत सिडकोने विकासकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडांवरील इमारतींतील रहिवाशांनी स्थापन केलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीड ( भाडे पट्टा करार ) करून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आणि रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. या प्रक्रियेमुळे केवळ सहकारी संस्थांना नाही तर प्रत्यक्षात वास्तव्यास असणाऱ्या सदनिकाधारकांना आपला मालकी हक्क मिळेल.
डीम्ड कन्व्हेयन्स विषयक समज गैरसमज यावर मार्गदर्शन करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया उपस्थित होते. नागरिकांना लीज डीड करणे सोपे व्हावे तसेच नागरिकांसाठी डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेच्या माहितीसाठी एक खिडकी योजना, ई-मेलची आणि एसएमएसची देखील सुविधा लवकरच करणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी दिली. डीम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेकरिता सहकार खात्याला २ हजार रुपये, सदनिकेच्या चटई क्षेत्रानुसार स्टॅम्प ड्युटी आणि सिडकोच्या मोफा अधिनियमानुसार हस्तांतरण प्रक्रिया शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती भाटीया यांनी दिली.