Janata Darbar
जनता दरबार :
सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जनतेशी थेट संवाद साधणारी आणि जनतेच्या प्रश्नांवर “ऑन द स्पॉट” तोडगा काढणारी “जनता दरबार” सारखी अभिनव संकल्पना श्री. गणेशजी नाईक यांनी राबविली. आज इतक्या वर्षानंतरही पालकमंत्री म्हणून जनतेशी सुसंवाद सुरु ठेवणारा जनता दरबार उपक्रमातील सातत्य हादेखील एक विक्रमच ठरावा.
‘जनतेने प्रेमाने व विश्वासाने आपले किंमती मत मला दिले आहे, त्यामुळे मी जनतेचा ऋणाईत आहे’ – ही भावना मनाशी बाळगूनच सर्वसामान्यांच्या हितरक्षणाचे ध्येय नजरेसमोर ठेवून गणेशजी नाईक जनतेच्या विश्वासाची परतफेड करतात. यातूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विविध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
“जनता दरबार” ची व्याप्ती अधिक वाढवत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी दरबाराचे आयोजन केले जाऊ लागले. “सुलभपणे उपलब्ध असणारा आपला हक्काचा मंत्री” ही जनसामान्यांच्या मनातील भावना अधिक दृढ झाली. जनता दरबाराचेही स्वरुप बदलत त्यांनी “उद्याचे काम आज करा, आणि आजचे काम आत्ताच करा” हे ब्रीदवाक्य धारण करीत तत्पर आणि कृतीशील कार्यपद्धतीवर भर दिलेला दिसून येते.
जनतेचा आपल्यावरील सार्थ विश्वास गणेशजी नाईक यांनी नेहमीच शहर विकासाच्या माध्यमातून नागरी सुविधांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पूर्णत्वास नेला आहे. यामुळेच नवी मुंबई शहराची आज केवळ राज्य, देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरही स्वत :ची स्वतंत्र ओळख निर्माण झालेली दिसून येते.
Navi Mumbai Shikshan Sankul
नवी मुंबई शिक्षण संकुल : “नवी मुंबई शिक्षण संकुल” दरवर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेसारखीच “एस.एस.सी.सराव परीक्षा” आयोजित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत्मविश्वास देते व गुणवंतांचे पारितोषिक देऊन कौतुक करते. विद्यार्थीदशेपासूनच नेतृत्वगुण अंगी असणा-या गणेशजींचे नेतृत्व सर्वप्रथम ठसठशीतपणे पुढे आले ते उरण येथील विद्यार्थ्यांना मिळणा-या विद्यावेतनाप्रमाणेच (स्टायपेंड) ठाणे-बेलापूर पट्टीतील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन मिळायलाच हवे यासाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे. त्यांच्या जबरदस्त आंदोलनापुढे सिडको नरमली. विद्यावेतन सुरु झाले आणि गणेशजी नाईक हे नाव जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून अधोरेखीत झाले. Navi Mumbai Shikshan Sankul : With the aim of encouraging students for their performance...
Green Hope
ग्रीन होप : १९९५ या कालावधीत गणेशजी नाईक वने व पर्यावरण खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले. वन कर्मचा-यांना पाचवा वेतन आयोग लागू करण्यात तसेच वन कर्मचा-यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देऊन वनरक्षणाच्या दृष्टीने सामर्थ्य प्रदन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. “ग्रीन होप” संस्थेच्या माध्यमातून भव्य प्रमाणात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, खारफुटींचे रोपण-संवर्धन कार्यक्रम पर्यावरणविषयक जाणीव जागृती करीत राबविले जातात. शहर पर्यावरणाचा विचार करुन “इको सिटी” म्हणून नवी मुंबईची विकासात्मक वाटचाल सुरु असताना त्यामध्ये – स्वत : च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पातून जलस्वयंपूर्णता, “सी” टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मलमिश्रीत अशुद्ध पाणी शुद्ध करणारी पर्यावरसंरक्षक...