स्वातंत्र्य दिनी नागरी सुविधांची भेट

Posted in News on Aug 16, 2014

६८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात विविध नागरी कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ पार पडले. शहराच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत लोकप्रतिनिधींचे त्याच बरोबर पालिका अधिकाऱ्यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. शहरात निर्माण झालेल्या नागरी सुविधांचे संवर्धन करणे हि आपल्या सर्वांचे नैतिक जबाबदारी असून नवी मुंबई शहराला अधिक गतिमान बनविण्यासाठी आपण यापुढे देखील प्रयत्नशील राहू.

 

ठाणे बेलापूर मार्गावरील सर्व्हिस रोड झाला सुरु

sarvice road
ठाणे-बेलापूर हि जगातील मोठी औद्यागिक वसाहत म्हणून ओळखली जाते. ठाणे-बेलापूर हा राज्यातील एकमेव टोल मुक्त मार्ग आहे. भविष्यातील वाढती वाहनांची वर्दळ लक्षात घेता, या मार्गालगत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हिरवाईने नटलेला सुंदर दुपदरी सर्व्हिस रोड साकारण्यात आला आहे.

एनएमएमटीच्या ताफ्यात ५० बसेस

buses
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने अल्पावधीतच इतर महापालिकांच्या परिवहन सेवांना मागे टाकत विक्रम केला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या परिवहन सेवेच्या ताफ्यात आणखी ४० वातानुकुलीत व १० मिनी बसेस दाखल झाल्या आहेत. जेएनयुआरएमच्या माध्यमातून या बसेस दाखल झाल्या असून नवी मुंबईकरांना आता थेट विमानतळ, बोरिवलीला जाता येणार आहे.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube