सत्कार्य करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो

Posted in News on Aug 12, 2014

पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्याकडून गणेशोत्सव मंडळांचे कौतुक
सार्वजनिक श्री गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिकांसह क्रीडा शिष्यवृत्ती वितरण उत्साहात

128

नवी मुंबई हे बंधुभाव जपणारे सांस्कृतिक शहर असून येथील नागरिक एकमेकांच्या उत्सवात आपुलकीच्या भावनेने सहभागी होत असतात. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीपर संदेश देणाऱ्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात तसेच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामात मनापासून सहभागी होतात. अशा उदात्त हेतूने काम करणाऱ्या मंडळांचा अभिमान वाटतो अशा शब्दात राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी येथील गणेशोत्सव मंडळांचे कौतुक केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर मागील वर्षीचा नवी मुंबई महापौर सावजानिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा २०१३ चा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या नवी मुंबईकर खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
ना. गणेश नाईक यांनी यावेळी चांगले काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देणारा हा स्पर्धा उपक्रम सातत्याने सुरु ठेवल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, महापौर सागर नाईक, उप महापौर अशोक गावडे, सभागृह नेते अनंत सुतार, सिडको संचालक तथा स्वीकृत नगरसेवक नामदेव भगत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळपट्टू रघुनंदन गोखले, अ प्रभाग समितीच्या अध्यक्ष शैला नाथ, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष विनया मढवी, कार्यक्रमाचे निमंत्रक क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती शंकर मोरे व उप सभापती बाळकृष्ण पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती गुरखे, आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार व उप सभापती शिल्पा मोरे, मुख्यालय उप आयुक्त जे.एन.सिन्नरकर, क्रीडा विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाढ तसेच इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.

 Back To News….

 

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube