मेट्रो रेल्वेसाठी कार्यवाही करा

Posted in News on Jan 30, 2014

ठाण्यात मेट्रो रेल्वे ;  तातडीने कार्यवाही करा

 

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे निर्देश

 

मुंबई | प्रतिनिधी

ठाणे शहरामध्ये प्रस्तावित मेट्रो रेल्वे सुरु करण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी आज संबंधितांना विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीस ठाण्यातील आमदार तसेच आ. गणपत गायकवाड, कामगार नेते अशोक पोहेकर आदी उपस्थित होते. सदर कामा-बाबतची कार्यवाही जलदगतीने मार्गी लागण्यासाठी लवकरच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ना. नाईक यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी अनधिकृत बांधकामे होऊ नये याबाबत जिल्हा परिषद पंचायत समित्या यांनी दक्षता घ्यावी.अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमुळे पर्यावरण, सामाजिक स्वास्थ्य अशा गोष्टींवर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत जागृती करण्यात यावी, असे निर्देश ना. नाईक यांनी दिले.

 

ठाणे येथील मेट्रो रेल्वेचा नवीन मार्ग वडाळा, घाटकोपर, एल.बी.एस, मार्गे , मुलुंड , ठाणे, कसर वडवली असा निश्चित करण्यात आला आहे. या मार्गाच्या आराखड्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

– ना. गणेश नाईक , पालकमंत्री, ठाणे जिल्हा

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube