मिनी इनडोअर स्टेडीयमचे लोकार्पण
Posted in News on Feb 10, 2014
केंद्रीय कृषीमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते ढोकाळीतील आंतरराष्ट्रीय मिनी इनडोअर स्टेडिअमचे आज लोकार्पण रुणवाल गार्डन येथील तरुण तलावाचे भूमिपूजन
नवी मुंबई प्रतिनिधी
खा. डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या खासदार विकास निधीतून आणि ठामपाच्या निधीतून ढोकाळी येथे ठाण्यातले पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिनी इनडोअर स्टेडियम साकारले आहे. ठाणे शहरासाठी भुषनावह असलेल्या या स्टेडियमचे उद्घाटन उद्या ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळ ५.३० वाजता ढोकाळी नाका, कोलशेत रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी केंद्रीय कृषीमंत्री आणि कुशल क्रीडा संघटक नामदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याच बरोबर रुणवाल गार्डन येथील तरण तलावाच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम देखील पार पडणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, ठाणे लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. संजीव गणेश नाईक, आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित, कोपरी-पाचपाखाडी मतदार संघाचे आ.एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष-स्थान ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील भूषविणार आहेत.
खा. आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आ. जितेंद्र आव्हाड,आ.निरंजन डावखरे, आ.राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, आ.रमेश पाटील, ठामपा आयुक्त आसीम गुप्ता, ठामपाचे उपमहापौर मुकेश मोकाशी, स्थायी समितीचे सभापती विलास कांबळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, ठामपाचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, ठामपाचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर,स्थानिक नगरसेवक संजय भोईर आणि ठामपाचे लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ठाणे शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.येथील खेळाडूंमध्ये उत्तम प्रकारचे क्रीडा नैपुण्य पहावयास मिळते. अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. उदयोन्मुख खेळाडूंची संख्याही लक्षणीय आहे. ठाण्यात सध्या महापालिकेचे दादोजी कोंडदेव स्टेडीयम आहे. हे स्टेडीयम ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. घोडबंदर मार्गावर नवीन ठाणे मोठ्या प्रमाणावर विस्तारित होत आहे. येथे झपाट्याने नागरीकरण होत आहे. या भागातील खेळाडूंना सरावासाठी तसेच त्यांचे क्रीडागुण वाढविण्यासाठी अद्ययावत आणि सर्व सोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडीयम उभारण्याचा संकल्प खा. डॉ. संजीव गणेश नाईक यांनी व्यक्त केला होता. खा. डॉ. नाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नियोजित वेळेत या स्टेडीयमचे काम पूर्ण झाले असून यानिमित्त खा.डॉ. नाईक यांनी वचनपूर्ती देखील केली आहे. त्याच बरोबर जलतरण क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी रुणवाल गार्डन परिसरात उभारण्यात येणाऱ्या तरण तलावाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.