महामोर्चाने हादरली सिडको !

Posted in News on Jun 4, 2014

मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन होणार आणखी तीव्र

प्रकल्पग्रस्तांच्या घरांना हात लावाल तर खबरदार – आ. संदीप नाईक.

आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबईतील गाव – गावठाणातील प्रकल्पग्रस्त नागरिक , सिद्कोनिर्मित धोकादायक इमारतींमधून राहणारे रहिवासी, झोपडपट्टीवासीय, रेल्वे प्रकल्पग्रस्त नागरिक, माथाडी, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त, बीएमटीसी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आज सिडको महामंडळ आणि कोकण भवन कार्यालयावर महामोर्चा नेला. या महामोर्चात सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाले होते. या प्रचंड महामोर्चाने सिडको प्रशासन आणि शासन हादरले असून वर्षानुवर्षे  रखडलेल्या मागण्या जर तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक  तीव्र कण्याचा इशारा या महामोर्चाचे आयोजक डॉ. संजीव गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या घरांना हात लावाल तर खबरदार असा इशारा आमदार नाईक यांनी सिडकोला यावेळी दिला. मोर्चेकारांनी केलेल्या विनंतीनुसार राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारले आणि या मागण्या मंत्रिमंडळात सोडविण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करू. आंदोलन आणखी तीव्र करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा दिलासा आंदोलकांना दिला.

नवी मुंबई महापालिकेच्या नवीन मुख्यालयाजवळील क्रोमा इलेक्ट्रोनिक्स किल्ले गावठाण येथून या महामोर्चाला अतिशय शिस्तबद्ध    पणे सुरुवात झाली. बिपी मरीन,सकाळ भवन येथून हजारोंच्या संख्येने नागरिक मागण्या मंजूर करण्यासाठी कडक उन्हाची पर्व न करता पुढे जात होते. महापालिकेच्या जुन्या मुख्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर होऊन मोर्चाला मान्यवरांनी मार्गदर्शन  केले.

आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, असा इशारा डॉ. संजीव गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात शासन, सिडको आणि एमआयडीसीला दिला. राज्यात आघाडीचे शासन असतानाही जनतेला उन्हातान्हात आंदोलन करावे लागत आहे,हे दुर्देवी असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. यह तो झांकी है अभी बहोत कूच बाकी आहे., असे सांगत त्यांनी हा मोर्चा पाहून आता तरी सरकारला जाग येईल, अशी आशा व्यक्त केली.

गाव- गावठाणातील घरे नियमित करणे, साडेबारा  टक्के भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण करणे, सिडको वसाहतीमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचा अडीच एफएसआयच्या माध्यमातून पुनर्विकास, चार एफएसआयच्या माध्यमातून एसआरए योजनेतून झोपड  पट्ट्यांचा विकास, माथाडी कामगारांना घरे, बीएमटीसी कामगारांचे पुनर्वसन इत्यादी प्रलंबित मागण्यांबाबत सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती राधा आणि कोकण विभागीय उपयुक्त मोपलवार या दोघांना लेखी निवेदन दिले आहे. या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी आपल्या भाषणात दिला आहे.

 

प्रकल्पग्रस्त आणि इतर सर्व घटकांच्या मागण्या मंजूर होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे काही सहकार्य करता येईल ते आपण करू, असे अभिवचन नवी मुंबई महापालिकेचे महापौर सागर नाईक यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा चिटणीस प्रशांत पाटील यांनी सिडकोमध्ये प्रकाल्प्ग्रस्तांमधील अध्यक्ष आणि संचालक असते तर प्रलंबित प्रश्न केव्हाच सुटले असते, असे प्रतिपादन केले. मागण्या मान्य केल्या नाहीत तर सिडकोमध्ये घुसू असा इशारा त्यांनी दिला. पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा विकास केला. सिडकोने प्रकल्पग्रस्तांची उपेक्षा केली तर बिल्डर मंडळींना सन्मानाची वागणूक दिल्याची टका त्यांनी केली.

 

रस्त्यावर परत उतरण्याची वेळ येऊ देणार नाही – पालकमंत्री नामदार गणेश नाईक

सिडको, शासन आणि एमआयडीसी संबंधीच्या प्रलंबित माग्ग्न्या मान्य होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे, असे पालकमंत्री नामदार गणेश नाईक म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थीतीतही मुख्यमंत्र्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. सत्याचा आग्रह धरणे हा काही गुन्हा नाही. प्रकल्पग्रस्त आणि इतर घटकांवर आंदोलन करण्याची अशी वेळ यायला नको होती, असे सांगून नामदार नाईक म्हणाले कि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागण्या मांडून त्या तातडीने मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा करेन. नवी मुंबईत स्थायिक झालेला परप्रांतीय आणि येथील मुल रहिवासी दोन्ही घटक सन्मानाने जगले पाहिजेत, अशी आपली भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube