भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम ६ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करा

Posted in News on Jul 16, 2014

पालकमंत्री ना.गणेश नाईक यांची पालिका अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व घटकांना अंतिम मुदत

 

पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर- १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या लोकाभिमुख आणि शहराला भूषणावह ठरणाऱ्या वास्तूची उभारणी करण्यात काही तांत्रिक बाबींमुळे विलंब होतो आहे, हि वस्तुस्थिती आहे. या भवनाचे काम करणारा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित घटकांनी या प्रकल्पाच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर हाती घेऊन डॉ. आंबेडकर महपरिनिर्वाण दिन म्हणजेच ६ डिसेंबर २०१४ पर्यंत ते पूर्ण करण्याचे सक्त निर्देश पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिले आहेत. नवी मुंबईसाठी प्रेरणादायी अशा या स्मारकाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही ना.नाईक यांनी दिला आहे.

 

पालकमंत्री ना. नाईक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. संजीव गणेश नाईक, आ.संदीप नाईक, महापौर सागर नाईक, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, नगरसेवक अशोक पाटील, एम.के.मढवी, माजी नगरसेवक सुधाकर सोनावणे, माजी नगरसेवक भारत जाधव , राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य जी. एस. पाटील, फ प्रभाग समितीचे सदस्य दीपक पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, कार्यकारी अभियंता हरिश चिचारीया, उपअभियंता जयंत कांबळे, त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

स्मारकाची सुनियोजितपणे उभारणी व्हावी यासाठी पालकमंत्री ना. नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत. तर डॉ. संजीव नाईक आणि स्थानिक आमदार संदीप नाईक यांनी देखील अनेकदा यासंबंधी बैठका घेतल्या आहेत. तसेच पाहणी दौरा करून बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे.

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube