पुनर्बांधणीला मंजुरी मिळवून देणारच

Posted in News on Feb 12, 2014

नवी मुंबईच्या विकासाकरिता पुनर्बांधणीला मंजुरी मिळवून देणारच


‘पालकमंत्री आपल्या प्रभागात’ उपक्रमात ना. गणेश नाईक यांचा विश्वास

नवी मुंबई शहरात एकत्रित विकास योजना राबवल्यानंतरही नागरिकांच्या एका पैशाचीही वाढ होणार नसल्याची ग्वाही देतानाच शहर विकासाकरिता पुनर्बांधणीला आपण मंजुरी मिळवून देणारच असा ठाम विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी येथे दिला. पालकमंत्री प्रभागनिहाय बैठकांची मालिका सुरु असून त्याअंतर्गत आज ना. नाईक यांचा ‘ पालकमंत्री आपल्या प्रभागात ‘ या संकल्पनेच्या माध्यमातून विविध प्रभागांना भेटी देण्याचा उपक्रम सुरु असून आज वाशी येथील प्रभाग ५३ च्या भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापौर सागर नाईक, स्थानिक नगरसेवक वैभव गायकवाड, नगरसेवक राजू शिंदे, किशोर पाटकर, संपत शेवाळे, किरण झोडगे, कुरेशी, शंकर नारायणन, समी गवंड आदी मान्यवर उपस्थित होते. इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी आपण अडीच एफएसआय मिळून देणारच असे सांगत इमारतींच्या पुनर्बांधणी दरम्यान तेथील नागरिकांनीच आपला बांधकाम व्यावसायिक निवडायचा असून त्यानुसार इमारतींच्या पुनर्बांधणीला आपण मंजुरी मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला. पुनर्बांधणी व एकत्रित विकास योजना या माध्यमातून शहराचा विकास झाल्यानंतरही येथील नागरिकांच्या करामध्ये एक पैश्याचीही वाढ केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. सीबीडी येथे साकारत असलेला वन टाइम प्लानिंग अंतर्गतच्या पायलट प्रोजेक्टला अवघ्या १५ दिवसात सुरुवात होणार असून त्यामुळे सर्व भाषिक नागरिक गुण्या गोविंदाने राहणाऱ्या नवी मुंबईची ओळख भविष्यात चांगल्या लोकांचे शहर अशी होईल असेही ते म्हणाले. सीबीडी येथे साकारत असलेला वन टाइम प्लानिंग अंतर्गतच्या पायलट प्रोजेक्टला अवघ्या १५ दिवसात सुरुवात होणार असून त्यामुळे सर्व भाषिक नागरिक गुण्या गोविंदाने राहणाऱ्या नवी मुंबईची ओळख भविष्यात चांगल्या लोकांचे शहर अशी होईल असेही ते म्हणाले. नवी मुंबईत पाम बीच मार्गावर तसेच ठाणे बेलापूर मार्गावर एमएमआरडीए एकूण ८ ठिकाणी नवे पूल बांधणार असून कोपरखैरणे ते घाटकोपर आणि ऐरोली ते कल्याण दरम्यान होणारे नवे मार्गही नागरिकांना सुखद प्रवासाचा अनुभव देणारे ठरतील. असे सांगत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी इतर ठिकाणांच्या  तुलनेत नवी मुंबईतील महानगर पालिकेच्या शाळांमध्ये वर्षानुवर्षे पटसंख्या वाढतच चालली असल्याचे नमूद केले. शहरातील रस्त्यांवर, चौकात बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशा फेरीवाल्यांचा रोजगार हिस्कावण्याची आपली मानसिकता नाही. परंतु त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असल्याने धोरण लागू झाल्यानंतर एकही फेरीवाला इतरत्र बसू दिला जाणार नाही. त्यामुळे पालिकेच्या कारवायांना तूर्तास सौम्य करण्याच्या सूचनाही प्रशासनाला आपण दिल्याचे ते म्हणाले. महानगर पालिकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या फेरीवाला धोरणात नवी मुंबईच्या करदात्यालाच समाविष्ट  करून घेतले जाणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणाऱ्या पालिका मुख्यालय इमारतीने महानगर पालिकेचा भारतभर नावलौकिक होणार असल्याचे देखील पालकमंत्री ना. नाईक म्हणाले.

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube