पालिका मुख्यालयाचे उद्घाटन

Posted in News on Feb 17, 2014

देशातील पहिल्या पालिका हरित मुख्यालयाचे मंगळवारी उद्घाटन

केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते

 

सीबीडी सेक्टर १५ येथे पाम बीच जंक्शनलगत, भूखंड क्रमांक १, किल्ले गावठाणजवळ नवी मुंबई महापालिकेचे आधुनिक आणि देशातील पहिले पर्यावरणपूरक मुख्यालय साकारले आहे. या मुख्यालयाचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता केंद्रीय कृषिमंत्री ना. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या नेत्रदीपक समारंभास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री नामदार सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याचे नवीन व नवीकरणीय उर्जामंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक, राज्य विधान परिषदेचे सभापती वसंत डावखरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, खा. डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी आणि पालिकेचे आयुक्त ए. एल.जऱ्हाड हे आहेत. या कार्यक्रमास पालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  पालिकेचे हे मुख्यालय नवी मुंबईचे  मार्क  ठरणार आहे. या मुख्यालायात अनेक पर्यावरणपूरक बाबी निर्माण केल्या असल्याने देशातील पहिले हरित मुख्यालय म्हणून हे मुख्यालय लौकीकास प्राप्त होणार आहे. या मुख्यालयाच्या आवारात उभारला जाणार २२५ फूट उंचीवरील राष्ट्रध्वज हा देखील देशातील सर्वाधिक उंचीचा  ठरणार आहे त्याची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.

 

सुमारे ३ लाख ५८ हजार स्क़्वे. फूट  जागेच्या क्षेत्रफळात मुख्यालयाची ही इमारत उभी राहिली आहे. पालिकेने या भव्य पाच मजली मुख्यालयाकरिता सुमारे १६० कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. या मुख्यालयातील अनेक बाबींची नोंद ही लिमका बुकमध्ये होणार आहे. मुख्यालय इमारतीच्या उंचावर शेवटच्या टोकाला असलेला भव्य डोम हा देखील रेकॉर्डमध्ये नोंदविला जाणार आहे. या डोम खाली एकूण ४३.२ मीटरची जागा ही प्रदर्शनाकरिता उपलब्ध असणार आहे. हा डोम जीआरसी या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविण्यात आला असल्याने तो वजनाने हलका आहे. त्यामुळे मुख्यालय इमारत परिसरात भूकंप आला तरीही या डोमच्या वजनाचा परिणाम मुख्यालयाच्या इमारतीवर होणार नाही. संभाव्य दुर्घटनेची शक्यताही नाही. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोत विनीत पालकर यांच्या सूचनेप्रमाणे या मुख्यालय आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील लवकरच उभारला जाणार आहे.

या इमारती भोवती तेरा रेन हार्वेस्टिंग पिट बनविण्यात आलेले आहेत. त्याद्वारे पावसाळ्यात वाया जाणाऱ्या पाण्याची साठवणूक केली जाणार आहे. तसेच या मुख्यालय इमारतीच्या छतावर रिफ्लेक्टीव टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होऊन इमारतीमधील व सभोवतालचे तापमान नियंत्रित राखले जाणार आहे. भविष्यातील खर्चाच्या बचतीच्या अनुषंगाने इमारतीमधील उपहारगृहात किचन वेस्टचा वापर करून बायोगेस प्लांटद्वारे गेस निर्मिती करून त्याचा वापर केला जाणार आहे. तर या मुख्यालय आवारात असलेल्या उद्यानाकरिता एसटीपीमधून शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर करून पिण्याच्या पाण्याची बचत केली जाणार आहे. याच अनेक बाबींमुळे पालिका मुख्यालयाची हि इमारत पर्यावरणास पूरक असलेली पहिली शासकीय इमारत ठरून तिची ओळख हि ग्रीन बिल्डिंग अशी देशभर होणार आहे. इमारतीचा देखभालीचा खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने देखील अनेक उपाययोजना त्याठिकाणी राबविण्यात आल्या आहेत. इमारतीला केल्या जाणाऱ्या प्लास्टरचे ठराविक वर्षांनी पुन्हा दुरुस्ती काम करावे लागत असल्याने पालिका मुख्यालय इमारतीला ड्राय क्लाडींग करण्यात आले आहे. त्यामुळे वारंवार इमारतीला प्लास्टर करण्याचा प्रशासनाचा खर्च तळणार आहे.

 

मुख्यालयासमोर फडकणारा राष्ट्रध्वज हे सर्वांचे आकर्षण ठरणार आहे. २२५ फुट उंचीवर हा ध्वज फडकणार आहे. राष्ट्रध्वजाची हि उंची देशात सर्वाधिक असल्याने त्याचीही नोंद लिम्का रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे. या मुख्यालयाच्या निर्मितीमध्ये खा.डॉ.संजीव गणेश नाईक यांच्या संकल्पनेनुसार अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक बाबी साकारल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे खासदार डॉ. संजीव नाईक यांनी पालिका मुख्यालयासमोर सर्वाधिक उंचीचा ध्वज उभारण्याची हि संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. विशेषत्वाने या उंच ध्वजामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसविला जाणार असून त्याद्वारे संपूर्ण मुख्यालय परिसरातील हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.

 

मुख्यालयाची वैशिष्ट्ये :

तळमजला – पश्चिम बाजूस – १) लेखा परीक्षण विभाग. २) योजना विभाग. ३) लेखा विभाग. उत्तर बाजूस – १) कॉफेटेरिया. २) महिला विश्रांती कक्ष / पाळणा घर.

पूर्व बाजूस – १) कर निर्धारक विभाग. २) अतिक्रमण विभाग. ३) मालमत्ता विभाग. ४) आपत्कालीन व्यवस्थापन विभाग. ५) ई -टेंडरिंग शाखा. ६) नागरी सुविधा केंद्र प्रमुख कक्ष. ७) नागरी सुविधा केंद्र. ८) अम्पिथिएटर

 

पहिला मजला – ( भाविष्याकरिता विभागांसाठी बहुतांश भाग रिक्त ). १) सर्व्हर रूम. २) यु.पी. एस. रूम. ४) भांडार विभाग. ५) कर्मचारी पतपेढी.

 

दुसरा मजला – पश्चिम बाजूस – नगर रचना विभाग. उत्तर बाजूस – १) शहर अभ्यंत विभाग. २) अतिरिक्त शहर अभियंता विभाग. पूर्व बाजूस – १) वाहन विभाग. २) विद्युत विभाग (संगणक विभागासह).

 

तिसरा मजला – पश्चिम बाजूस – अतिरिक्त आयुक्त यांच्या अधिपत्याखालील विभाग. २) उपआयुक्त परिमंडळ -१. ३) विधी विभाग. ४) प्रशासन विभाग. उत्तर बाजूस – १) जनसंपर्क विभाग. २) उपआयुक्त परिमंडळ -२. ३) परवाना विभाग. ४) आरोग्य विभाग. ५) घनकचरा विभाग. पूर्व बाजूस – १) प्रशिक्षण सभागृह. २) सभापती कार्यालये. ३) सचिव विभाग.

 

चौथा मजला – पश्चिम बाजूस – १) महापौर कार्यालय व प्रतीक्षा कक्ष. उत्तर बाजूस – १) प्रतीक्षा कक्ष. २) स्थायी समिती सभागृह. ३) विषय समिती सभागृह. ४) पत्रकार कक्ष. ५) स्थायी समिती सभापती, उपमहापौर, पक्ष प्रतोद, विरोधी पक्ष नेता यांची कार्यालये.  पूर्व बाजूस – १) आयुक्त कार्यालय व प्रतीक्षा कक्ष.

 

पाचवा मजला – ( पहिला स्तर ) १) महासभागृह. २) महासभेस उपस्थित अधिकारी बैठक कक्ष. ३) महापौरांचे खाजगी कक्ष. ४) ०९ विषय समिती सभापती कार्यालये. ५) नगरसेवक / नगरसेविका यांच्याकरिता लॉकर व विश्राम कक्ष. पाचवा मजला -(तिसरा स्तर) – १) पत्रकार व अभ्यंगत  ग्यालरी. २) ध्वनी व प्रकाश व्यवस्थापन कक्ष. ३) पत्रकार बैठक कक्ष. ४) स्टोअर रूम. ५) चहापान व्यवस्था. प डोम खाली – प्रदर्शन कक्ष.

 

 Back To News….

 

 

 

 

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube