पायलट प्रोजेक्ट

Posted in News on Feb 26, 2014

ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतील एकत्रित नियोजन व विकास पथदर्शी प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टचा आज सीबीडी येथे शुभारंभ

नवी मुंबईला धर्तीवर आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त करून देण्याचा ध्यास घेऊन पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जनमानसाचा अंदाज घेत व्यापक ‘ ग्लोबल व्हिजन ‘ नजरेसमोर ठेवले असून नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा प्रत्यक्ष साकारणारा नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. या एकत्रित नियोजन व विकास पथदर्शी प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ उद्या बुधवार दि . २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सेक्टर १५ सीबीडी – बेलापूर येथे मारुती पेरेडाईज सोसायटीजवळील प्रोमोनेडजवळील ठिकाणी पार पडणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत नवी मुंबईचा परिपूर्ण आणि सर्वांगीण विकास साधला जाणार असून पायाभूत सुविधांची वैशिष्ट्यपूर्ण कामे होणार आहेत. या प्रकल्पाचा शुभारंभ या संकल्पनेचे जनक पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खा. डॉ. संजीव गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे निमंत्रक महापौर सागर नाईक हे आहेत.
नवी मुंबई हे शहर देशातील अग्रगण्य शहर आहे. स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असणारी जलसमृद्धता या शहराला लाभली आहे. जगातील अनेक शहरांना भेडसावणारी कचऱ्याची समस्या सोडविण्यात नवी मुंबई महापालिकेने अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून घेतलेली आघाडी जागतिक स्तरावर नावाजली जात आहे. सी-टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित इको फ्रेंडली मलप्रक्रिया केंद्राच्या काराप्रनैचे जागतिक पर्यावरण तज्ञांनी अनेकदा कौतुक केले आहे. शहरातील आधुनिक नागरी सुविधांमुळे नवी मुंबई महापालिकेला विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ना. गणेश नाईक यांची दूरदृष्टी, समर्थ नेतृत्व आणि अचूक निर्णय क्षमतेमुळे या शहराला हे बहुमान प्राप्त झाल्याचे महापौर सागर नाईक यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय शहर निर्मितीची नवी मुंबईत नांदी होत असून त्याच्या शुभारंभाच्या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर सागर नाईक केले आहे.

कसा आहे पायलट प्रोजेक्ट

१) सीबीडी सेक्टर १५ मधील सर्व रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण करण्यात येणार असून बिटूमेन तंत्रज्ञानाचे पदपथ, करस्टोन आणि इंटरलॉक पद्धतीच्या टाइल्स ज्याला एस डब्ल्यू कव्हर्स असणार आहेत. सुनियोजित आणि पर्यावरणपूरक पदपथ, दिवाबत्ती आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था.
२) रम्पसह बहुस्तरीय पार्किंग व्यवस्था. फूडकोर्ट आणि स्वच्छतागृहाची सुविधा (प्लॉट नं. १ अ, २ आणि ७).
३) ८० मि. मी. जाड पेव्हर ब्लॉक पार्किंग, ड्रेनेज व्यवस्था, ….स्किपींग ,रोड फर्निचर, सेमी हायमास्ट दिवे इत्यादी (प्लॉट नं. 39).
४) सुयोग्य संकल्पनेसह बगीच्याची पुनर्बांधणी, मुलांसाठी खेळणी बसविणे, आकर्षक प्रवेशद्वार आणि विविध ठिकाणी दिव्यांची स्थापना
५) प्रोमोनेडजवळील पायऱ्यांची आणि इंटरलॉकिंग स्टाईलची दुरुस्ती. उतारांवर वृक्षारोपण, जलसंधारण सुविधेसह सौंदर्यीकरण, स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग, डेकोरेटिव्ह दिव्यांसह संगीत व्यवस्था.

 

Back To News….

 

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube