नागरिकांच्या सोयीकरिता नेरूळ माता बाल रुग्णालय बाह्य रुग्ण सेवा कार्यान्वित

Posted in News on Aug 12, 2014

रुग्णालय संख्या वाढ अभिनंदनीय – ना. गणेश नाईक

nerul opd

 

नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन रुग्णालय संख्येत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय व त्याची केलेली अंमलबजावणी अभिनंदनास पात्र आहे, असे मत राज्याचे नवीन व नविकरणीय उर्जा मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

नेरूळ से. १५ येथील मॉंंसाहेब मीनाताई ठाकरे माताबाल रुग्णालय येथे बाह्य रुग्ण सेवा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मंत्री महोदयासमवेत महापौर सागर नाईक, उप महापौर अशोक गावडे, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते  अनंत सुतार, परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे, ब प्रभाग समितीच्या अध्यक्ष स्नेहा पालकर, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष विनय मढवी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती गुरखे, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती शंकर मोरे, कार्यक्रमाचे निमंत्रक आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार व उपसभापती शिल्पा मोरे, स्थानिक नगरसेविका अनिता शेट्टी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उप आयुक्त जे.एन.सिन्नरकर तसेच इतर मान्यवर नगरसेवक , नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.

नेरूळच्या रुग्णालय इमारतीत इतर संपूर्ण आरोग्य सुविधा कार्यान्वित करण्यासाठी थोडासा कालावधी लागणार असला तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता येथील नागरिकांना प्राथमिक स्वरुपाची आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बाह्य रुग्ण सेवा अर्थात ओ.पी.डी. सर्व्हिसेस सुरु करण्याचा निर्णय हा लोकहिताय आहे, असे कौतुकोद्गारही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

सर्वच क्षेत्रांप्रमाणे उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यातही नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून नेरूळ परिसरातही नागरिकांच्या सोयीकरिता प्राथमिक स्वरुपात बाह्य रुग्णसेवा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर सागर नाईक यांनी दिली.

दरम्यान, अशाचप्रकारे नागरिकांच्या सोयीकरिता दि. १२ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ११.०० वा. बेलापूर गांव येथील माताबाल रुग्नालायःया इमारतीत तसेच दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. सेक्टर ३, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ  माताबाल रुग्णालयाच्या इमारतीत प्राथमिक स्वरुपात बाह्य रुग्ण सेवा (ओ.पी.डी.) शुभारंभ संपन्न होत आहे.

Back To News….

 

 

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube