नवी मुंबई धावली !…
Posted in News on Jan 13, 2014
नवी मुंबई धावली…!
मॅरेथॉन २०१४ ला विक्रमी प्रतिसाद
शशिकांत डांगे, हर्षली पस्पे खुल्या गटात विजेते
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद लाभला. खेळाडूंसह सर्व स्तरातील आणि वयोगटातील ७ हजारांपेक्षा जास्त नवी मुंबईकर या स्पर्धेत धावले आणि आपल्या सामाजिक जाणीवा घट्ट असल्याचे दाखवून दिले. जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवामधील आजची ही मॅरेथॉन स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली.८ किलोमीटरच्या खुल्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात शशिकांत डांगे याने तर महिलांच्या गटात हर्षली पस्पे यांनी विजय प्राप्त केला.स्पर्धेसाठी खास उपस्थित राहिलेले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलीब्रीटीजमुळे स्पर्धकांचा उत्साह पाहण्याजोगा होता.लोकनेते पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते मुख्य मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.क्रीडा महोत्सवाचे आयोजक आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.बॉलिवूडमधील सर्वांचा आवडता अभिनेता सोहेल खान, डोंबिवली फास्टफेम मराठी अभिनेता संदीप कुलकर्णी आणि आपल्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारा गायक शंकर महादेवन यांचे स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत स्वागत केले.
नवी मुंबई हे आपलेपण देणारे शहर असल्याची भावना नामदार नाईक यांनी व्यक्त केली.नवी मुंबईत भारताच्या काना कोपऱ्यातून आलेले सर्वधर्मीय गुण्या-गोविंदाने राहतात.त्यामुळे हे शांततेचे शहर म्हणून ओळखले जात असल्याचेही ते म्हणाले. विविध सामाजिक संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. हे शहर प्रत्येकाला आपलेपण देणारे असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईच्या जागरूक नागरिकांनी शहराच्या विकासाची धुरा योग्य लोकप्रतिनिधींच्या हाती दिली आहे. त्यामुळेच इतरत्र पाण्याची चणचण असतानाही नवी मुंबईत ५० रुपये दराने ३० हजार लिटर पाणी दिले जाते, शिवाय इतर महानगर पालिकांमध्ये एलबीटी हा ३ टक्के आकारला जात असल्याचे नमूद केले.
आमदार संदीप नाईक यांनी नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या भावनेतून ही मॅरेथॉन आयोजित केल्याचे सांगितले. त्यास नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याबद्दल आनंदही त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा मॅरेथॉनमधून आरोग्य, क्रीडा व पर्यावरण विषयक जनजागृती होईल, अशी आशा व्यक्त केली. या मॅरेथॉनला यापुढे आणखी भव्य स्वरूप देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
अभिनेता सोहेल खान याने मॅरेथॉनच्या आयोजकांचे कौतुक केले. सिगरेट आणि दारू या व्यसनांपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्यात खेळांची रुची निर्माण होणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. खेअच्य माध्यमातून तरुणांमध्ये शिस्त निर्माण होते. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवल्याचे सोहेल खान म्हणाला.
मुंबई-पुणे प्रवासादरम्यान बाहेरून पाहिलेली नवी मुंबई प्रत्यक्षात आतून पाहायला मिळाल्याचा आनंद अभिनेता संदीप कुलकर्णी याने बोलून दाखविला. या शहराला आमदार संदीप नाईक व महापौर सागर नाईक यांच्यासारखे तरुण राजकारणी लाभले आहेत. त्यांच्या मार्फत होणाऱ्या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये एकत्रित जागृती निर्माण केली जात आहे. समाजाने महिलांना सन्मान देणे गरजेचे असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
शंकर महादेवन यांनी नाचविले
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे हा आपला सन्मान असल्याचे सांगितले. आपण या नवी मुंबई मध्ये राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे नमूद केले. महादेवन यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेल्या कोई कहे कहता रहे, कितना भी हमको दिवाना ……..आणि सुनो गौर सें दुनिया वालो, बुरी नजर न हमपे डालो….. या गाण्याच्या सुरावर उपस्थित तरुणाई आणि नागरिक थिरकले. महादेवन यांच्या जोशपूर्ण गाण्यांनी वातावरण संगीतमय बनले होते.
या मॅरेथॉन स्पर्धेप्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिअशनचे सेक्रेटरी डॉ इंद्रजीत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस कोपरखैरणे तालुका अध्यक्ष केशव म्हात्रे, नगरसेवक चंद्रकांत पाटील(महापे), नगरसेवक सांजा पाटील, रवींद्र म्हात्रे, नगरसेविका शिल्प मोरे, शुभांगी सकपाळ, इंदुमती तिकोने, नगरसेवक राजू शिंदे, संपत शेवाळे, रविकांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस समारंभ पालकमंत्री नामदार नाईक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. विजेत्यांना रोख रक्कम,प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
गटनिहाय प्रथम ५ विजेते आणि त्यांनी नोंदविलेली वेळ
१४ वर्षे गट – मुली अंतर ३ किमी
१ ऋतुजा आरोटे १० मि.३६ सें.
२ दिम्ल्पे चौधरी १० मि.३६ सें.
३ दीक्षा सोनसुनवार ११.००
४ दिव्युशा निकिता ११.२३
५ गीतांजली नरसाळे ११.४३
१४ वर्षे गट – मुले अंतर ३ किमी
१ श्रेयस जमदाडे १०.०४
२ प्रतिक पाटील १०.०६
३ विशाल सोळंकी १०.०८
४ निखिल वाघे १०.१३
ओमकार शिर्के १०.१५
१६ वर्षे गट – मुली अंतर ५ किमी
१ रुपाली बडे २०.२७
२ पूजा डांगे २१.०३
३ स्वाती गर्जे २१.३७
४ अंकिता डांगे २२.१२
५ कविता जेधे २३.२८
१९ वर्षे गट – मुली अंतर ६.५ किमी
१ शुभांगी एरंडे २९.१६
२ शीतल कांबळे ३१.०३
३ दिपाली मोरे ३१.१५
४ पूजा सगाने ३२.२१
५ योगिता मने ३२.४५
१९ वर्षे गट – मुले अंतर ६.५ किमी
१ सागर म्हसकर २१.१५
२ रोहित कनोजिया २१.३८
३ अमोल परांडे २२.५०
४ अक्षय वाडकर २३.२०
५ शुभम दलाऊ २३.४४
१६ वर्षे आतील गट – मुले
१ शिवानंद जमादार २४.२७
२ रोशन बोराडे २५.२१
३ अर्जुन प्रकाश २५.३०
४ विशाल सोळंकी २५.३३
५ यश चोगले २८.४०
खुला गट – महिला अंतर ८ किमी
१ हर्षली पस्पे ३४.५७
२ प्रियांका मोकल ३५.२८
३ मृणाल कांबळे ३७.१६
४ प्रणाली कवाडे ३९.१९
५ गीतांजली आरोठे ४२.४१
खुला गट – पुरुष अंतर ८ किमी
१ शशिकांत डांगे २४.२८
२ हरीमोहन चौधरी २२.२५
३ सुनील फापळे २८.०३
४ एम बी गावित २९.०६
५ विनायक एरंडे २९.३१
जेष्ठ नागरिक – पुरुष अंतर २ किमी
१ दिनकर ठाकूर १२.१४
२ मनोहर काळे १२.४०
३ पी टी कांबळे १३.०१
जेष्ठ नागरिक – महिला अंतर २ किमी
१ राणी बत्रा १५.०१
पत्रकार -शिक्षक = पुरुष अंतर किमी
१ वसंत भोईर ९.१०
२ प्रदीप मसूद १०.२१
३ रविकांत शिवशरण १०.२४
पत्रकार-शिक्षक = पुरुष अंतर २ किमी
१ वसंत भोईर ९.१०
२ प्रदीप मसूद १०.२१
३ रविकांत शिवशरण १०.२४
पत्रकार – शिक्षक = महिला
१ रिता लोंढे
२ आरती संपत
पुरुष अपंग गट अंतर ०.५ किमी
१ किशोर उगले
२ संतोष गोडावडे
३ मिरज खान
४ संजय हेलगीस
५ सुधीर भोकरे
महिला अपंग गट अंतर ०.५ किमी
१ मोनाक्षी जाधव
२ सुवर्णा कांबळे
३ अनिता पवार