झोपडपट्टीधारकाला मोफत हक्काचे घर

Posted in News on Feb 14, 2014

क्लस्टर विकासाच्या माध्यमातून

 झोपडपट्टीधारकाला मोफत हक्काचे घर

 

पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांची माहिती

तुर्भे येथील प्रभाग बैठकीला हजारोंची उपस्थिती

 

 

नवी मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मोफत हक्काचे घर मिळेल असा विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ‘ पालकमंत्री आपल्या प्रभागात ‘ या संकल्पनेच्या माध्यमातून तुर्भे येथील नागरिकांशी सुसंवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली. तसेच अवघ्या ८ ते १० दिवसात क्लस्टर  डेव्हलपमेंटचा निर्णय घोषित होईल, असेही ते म्हणाले.

तुर्भे येथील प्रभाग ४३, ५७ ,आणि ५८ च्या नागरिकांशी पालकमंत्री नामदार नाईक यांनी संवाद साधला. यावेळी महापौर सागर नाईक, नगरसेवक चंद्रकांत पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील, माजी सरपंच रामकृष्ण पाटील, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री ना. नाईक यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय अवघ्या ८ ते १० दिवसात होईल असा विश्वास व्यक्त केला. त्या माध्यमातून शहरातील सुमारे ४५ हजार झोपडपट्टीधारकांना मोफत हक्काचे घर मिळेल असेही ते म्हणाले. नवी मुंबईची सध्याची लोकसंख्या जरी १२ लाखाच्या आसपास असली तरी शहरातील मलनिसारण व्यवस्था, मोरबे जलसाठा हे ३० लाख लोकसंखेकरिता सक्षम असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वन टायमिंग प्लानिंग योजनेअंतर्गत सीबीडी सेक्टर १५ येथील विभागाचे विकासकाम सुरु असून अवघ्या दोन महिन्यात तेथे झालेला विकास प्रत्यक्षात पाहायला मिळणार असल्याचे देखल त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, बस  प्रवासात सूट आदी सुविधा पुरवल्या जात आहेत. अशा स्थितीत अधिकाधिक ज्येष्ठांना  त्याचा लाभ व्हावा याकरिता ज्येष्ठत्वाची वयोमर्यादा ६५ वर्षावरून ६० वर्षे करण्याचा आपला विचार असल्याचे देखील ते म्हणाले. त्याशिवाय पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढतच असताना तेथील विद्यार्थ्यांना मोफत योग शिक्षा दिली जावी याबाबतच्या सूचना आपण महापौर सागर नाईक यांना दिल्या असल्याचे देखील पालकमंत्री ना. नाईक म्हणाले. १८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणारे सीबीडी येथील पालिका मुख्यालय इमारत हि भारतात प्रतिष्ठेची ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यादरम्यान नामदार नाईक यांनी कार्यक्रमस्थळी ठेवलेल्या पेटीमध्ये स्थानिकांच्या समस्यांची पत्रे घेतली. तर या कार्यक्रमास परिसरातील सुमारे दीड हजार सर्वभाषिक नागरिक उपस्थित होते. या सर्वांना मार्गदर्शन करताना तुर्भे परिसरात सध्या भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या लवकरच सोडवली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube