जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस

Posted in Uncategorized on Mar 19, 2014

होळीच्या दिवशी हल्ला ;

जखमींची ना. गणेश नाईक यांच्याकडून विचारपूस

 

होळीच्या दिवशी तुर्भे येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेची ( वय – ६० ) व अन्य जखमींची आज पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, आरोग्य सभापती राजू शिंदे, परिवहन समिती सदस्य अन्वर शेख, परिवहन समिती सभापती मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते. या मारहाणीत जखमींमध्ये साखरबाई शीलवंत (६०), दीपक शीलवंत (२८), जगजीवन शीलवंत (३५) गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयातील ट्रामामध्ये उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या कुटुंबातील तीन लहान मुलेही जखमी झाली होती, मात्र उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. होळीच्या दिवशी सकाळी दोन लहान मुलेही जखमी झाली होती, मात्र उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. होळीच्या दिवशी सकाळी दोन लहान मुलांमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या जगजीवन शीलवंतला मारण्यासाठी शत्रुघ्न शिंदे उर्फ शत्रू यांनी १० ते २० मुलांना मारण्यासाठी आणले आणि जगजीवनला लाठी, लोखंडी रॉडने मारहाण केल्याने जगजीवनच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याच दरम्यान जगजीवनला बघायला आलेली त्याची आई साखरबाई हिला शत्रू शिंदे आणि त्याच्या मित्राने केलेल्या मारहाणीत ती जखमी झाली. या घटनेची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, सदर प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube