ऐरोलीत इको वॉक जॉगिंग पार्क

Posted in News on Feb 10, 2014

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे गौरवद्गार

– आ. संदीप नाईक यांच्या आमदार निधीला अभिनव उपक्रम

नवी मुंबई | प्रतिनिधी

ऐरोली येथील लोकप्रतिनिधी, सुज्ञ नागरिक आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी आ. संदीप नाईक यांच्याकडे सुंदर असे पर्यावरणाला समर्पक असे  इको वॉक जॉगिंग पार्क उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपल्या आमदार विकास निधी अंतर्गत या ठिकाणी नागरिकांच्या करिता जॉगिंग ट्रेकरुपी नंदनवन फुलविले आहे. लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य जनता व लोकप्रतिनिधीचे प्रतिक म्हणजे हा  इको वॉक जॉगिंग पार्क आहे, असे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी आज ऐरोली येथे काढले.
सोनेरी किरणांना साक्ष मानत व उद्याच्या आयुष्याचा मुक्त श्वास घेत सेक्टर-१७, ऐरोली प्लाझा चौक, गणेश मंदिर, ऐरोली येथे साकारलेल्या  इको वॉक जॉगिंग पार्कचे लोकार्पण आज पालकमंत्री ना.गणेश नाईक बोलत होते.
या जॉगिंग पार्कच्या लोकार्पण सोहळ्यात ठाणे लोकसभा मतदार संघाचे खा. डॉं.संजीव गणेश नाईक ,ऐरोली विधान सभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक, उपमहापौर अशोक गावडे, नमुंमपाचे सभागृह नेते अनंत सुतार , स्थानिक नगरसेवक अशोक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य जी.एस.पाटील,परिवहन सभापती मुकेश गायकवाड , शिक्षण मंडळाचे सभापती सुधाकर सोनावणे त्याच बरोबर योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर, योग संस्थेच्या शकुंतला निंबाळकर, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा पर्यावरण संतुलनाचे प्रतिक मानले जाणारे तुळशीरोप देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक अशोक पाटील यांच्या प्रभागात आ. संदीप नाईक यांचा ६० लाख रुपयांचा आमदार निधी व नवी मुंबई महानगरपालिकेचा ६० लाख अशा एकूण १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण असा सुंदर व पर्यावरण पूरक   इको वॉक जॉगिंग पार्क साकारला आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना. नाईक म्हणाले कि, ऐरोली हा परिसर चांगल्या विचारधारेच्या नागरिकांचा परिसर आहे. या प्रभागातील नागरिकांचा चांगले काही देण्यासाठी आ. संदीप नाईक यांनी घेतलेला पुढाकार यामुळे आज सुंदर असे जॉगिंग ट्रेक साकारले आहे. एकात्मता समतेची शिकवण देणाऱ्या नवी मुंबईतील सर्व धर्मियांसाठी त्यांची धार्मिक शक्ती त्याच बरोबर क्रांतीवीरांचे स्मरण व्हावे याकरिता त्यांच्या नावे सामाजिक वास्तू उभारण्यात येणार आहेत. नवी मुंबईची जगात पर्यावरणचे शहर म्हणून ओळख व्हावी यासाठी प्रत्येक नोड मध्ये अशा प्रकारचे जॉगिंग पार्क उभारण्याचा मानस पालकमंत्री ना. नाईक यांनी व्यक्त केला.
सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणी नुसार आपल्या आमदार निधीतून मतदार संघात अशा प्रकारे लोकाभिमुख प्रकल्प साकारत असल्या बद्दल आ. संदीप नाईक यांनी समाधान व्यक्त केले. मेट्रो सिटी, इन्फो सिटी म्हणून नवी मुंबई शहराला ओळखले जाते. अशा प्रकारच्या जॉगिंग पार्क मधून या शहराची पर्यावरणाचे शहर म्हणून ओळख होईल असेही आ. नाईक म्हणाले. ऐरोलीत साकारलेला हा पहिला  इको वॉक जॉगिंग पार्क शहरासाठी भुषणावह ठरेल, असा विश्वास आ . नाईक व्यक्त केला. पर्यटनाच्या माध्यमातून ऐरोलीचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ. नाईक म्हणाले.
स्थानिक नगरसेवक अशोक पाटील यांनी आपल्या प्रभागात जॉगिंग पार्क साकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा आपण यापुढेही देऊ अशी ग्वाही नगरसेवक पाटील यांनी दिली.
आकाशात रंगी बेरंगी फुगे सोडून व कोनशिलेचे अनावरण करून या जॉगिंग पार्कचे उद्घाटन मान्यवरांनी केले. तर येथील पद्मश्री निंबाळकर यांच्या श्रुद्राव्य योग सधनेक्क्षि माहिती व पक्षांच्या चित्रांची माहिती देखील मान्य वरांनी घेतली. इको वॉक जॉगिंग पार्कच्या संकल्पनेचे नागरिकांनी कौतुक करत पालकमंत्री ना. गणेश नाईक, खा. डॉं. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक यांचे सामाजिक संस्थांनी पुष्प गुच्छ देऊन आभार मानले.
ऐरोली गणेश चौक ते ऐरोली-१० डिमार्ट असा १३०० मीटर लांबीचा हा इको वॉक जॉगिंग ट्रेक आहे. याठिकाणी नागरिकांना व्यायामासाठी तसेच विरंगुळ्यासाठी उत्तम ठिकाण यानिमित्त उपलब्ध झाले आहे. या ठिकाणी असणारे नक्षत्र उद्यान आणि विविध फुलझाडांच्या शोभिवंत रचना नागरिकांना पाहता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्यात आली असून त्यांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हा इको वॉक जॉगिंग पार्क जेवढा नयनरम्य आणि निसर्गसौंदर्यांनी बहरला आहे तेवढाच तो माहितीपूर्णही आहे. नवी मुंबईत आढळणाऱ्या दुर्मिळ पक्ष्यांचे माहिती फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. ऐरोली इको वॉक जॉगिंग पार्क मध्ये योग साधनेसाठी मुबलक जागा तयार करण्यात आली आहे. नक्षत्र उद्यानाच्या मधोमध हि जागा आहे. योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर योग विद्या निकेतन, नवी मुंबई आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोफत योग प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेता येणार आहे.

* आ . संदीप नाईक यांनी नेहमीच पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेतली आहे. ऐरोली साकारलेला हा जॉगिंग पार्क आम्हा ज्येष्ठ नागरिकांना एक प्रकारे आधारच आहे. – सोनावणेकाका (सेक्टर-१४, ज्येष्ठ नागरिक)

* आमची अनेक वर्षापासूनची मागणी पालकमंत्री, आमदार , खासदार व स्थानिक नगरसेवक अशोक पाटील यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहे. याचा आम्हाला आनंद आहे. येथील योग केंद्राचा ऐरोलीकारांनी लाभ घ्यावा. – स्मिता चव्हाण (सेक्टर-१५, ज्येष्ठ नागरिक)

* ऐरोलीतील युवकांसाठी हे जॉगिंग पार्क आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांना अशा प्रकारे एक दालन खुले केल्याबद्दल सर्वांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. –  अनिकेत गायकर (सेक्टर-१५ , कॉलेज युवक)

* जॉगिंग करण्याबरोबरच याठिकाणी दुर्मिळ पक्षांची माहिती आम्हा लहान मुलांना मिळणार आहे. जॉगिंग पार्क मध्ये असणाऱ्या योगा केंद्रात आम्ही नेहमी जाणार त्याचा आनंद घेणार. – शुभम आढागळे (शालेय विद्यार्थी).

 

jog1-s jog3-s jog4-s jog5-s jogging2-s

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube