वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे

Posted in News on May 21, 2014

वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील बांधवांना मिळणार हक्काची घरे

12

वर्तकनगर पोलिस वसाहतीतील रहिवाशांना अखेर एमएमआरडीएच्या घरांमध्ये अखेर प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून येत्या मंगळवारी या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्री ना. नाईक यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भेट घेऊन पोलिसांच्या घरांबाबत भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. ठाण्यातील वर्तकनगर पोलिस वसाहतीत धोकादायक इमारतींमध्ये ५५६ कुटुंबियांना आठ दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर येणार असल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती.

ठाणे शहरातील वर्तकनगर येथे १९६० ते १९७० च्या दशकामधील म्हाडाच्या माध्यमातून बांधलेल्या पोलिस वसाहतींची अतिशय वाईट अवस्था झाली. या वसाहतीतील रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून जनतेचे रक्षण करणारे पोलिस त्यांच्या कुटुंबीयांसह या इमारतीमध्ये राहत असून कित्येक पोलिसांची तिसरी पिढी येथूनच उदयास आलेली आहे. याचबरोबर भिवंडी दंगलीमधील शहीद पोलिसांचे कुटुंबीयही या कॉलनीत वास्तव्यास असून त्यांनी आपल्या घरांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून सुद्धा अद्यापपर्यंत निर्णय घेतला गेला नसल्याने त्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. यासंदर्भात वसाहतीमधील महिलांनी आ. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा विषय तडीस नेण्याचे साकडे घातले होते. वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील महिलांनी आ. प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार आ. सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.नाईक यांच्याकडे हा विषय तडीस नेण्याचे साकडे घातले होते. वर्तकनगर पोलिस वसाहतीमधील रहिवाशांना वर्तकनगर येथील एमएमआरडीएची १६० फुटांची दोन घरे एकत्र करून किमान ३२० फुटांची घरे देण्याची मागणी केली असता पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी सदर विषयी सामायिक भूमिका घेत संबंधित अधिक्षाकांसोबत पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Back To News….

 

Visit Us On FacebookVisit Us On TwitterVisit Us On Youtube