रमजान एकात्मतेची शिकवण देणारा सण

Posted in News on Jul 27, 2014

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे प्रतिपादन

ramjan

नवी मुंबई शहरात मुस्लिम, शीख, जैन आणि हिंदू समाज बांधव एक दिलाने वास्तव्यास आहेत. सर्वच समाज बांधव आपापल्या परीने धार्मिक सण साजरे करतात. मुस्लिम बांधवांनी नवी मुंबईला, समानतेची जोड दिली आहे. किंबहुना आपल्या भगवंताने दिलेला सामाजिक एकात्मतेचा संदेश समाजात रुजवीत रमजान सणाच्या इफ्तार पार्टीतून एकात्मतेची शिकवण दिली आहे, असे गौरवोद्गार  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी काढले.

जीवनधारा आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील अॅबोट हॉटेलमध्ये रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री ना. नाईक बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा महापौर सागर नाईक होते. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे पोलिस आयुक्त एल.के.प्रसाद, डॉ. संजीव गणेश नाईक, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आलम बाबा,स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, माजी उपमहापौर भारत नखाते, नगरसेवक साबु डॅनियल, समिलभाई शेख, रहिम खत्री, आलम तन्वर, नजर बिजणारी, सलीम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संजीव गणेश नाईक यांनी इफ्तारच्या या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना समाज बांधवांनी नवी मुंबईतील उपक्रमात सहभाग घेऊन एक आपुलकी शहराशी जोडली असल्याचे म्हणाले. येत्या मंगळवारी ( ता. २९ ) रमजान ईदच्या शुभेच्छा देखील डॉ. नाईक यांनी दिल्या.

महापौर सागर नाईक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. नवी  मुंबईत मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने राहत आहे. या समाजाने गुण्या गोविंदानेसमिलभाई शेख, रहिम खत्री, आलम तन्वर, नजर बिजणारी, सलीम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संजीव गणेश नाईक यांनी इफ्तारच्या या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना समाज बांधवांनी नवी मुंबईतील उपक्रमात सहभाग घेऊन एक आपुलकी शहराशी जोडली असल्याचे म्हणाले. येत्या मंगळवारी ( ता. २९ ) रमजान ईदच्या शुभेच्छा देखील डॉ. नाईक यांनी दिल्या.

महापौर सागर नाईक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. नवी  मुंबईत मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने राहत आहे. या समाजाने गुण्या गोविंदाने राहत असताना शहराच्या विकासात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे. रोजा इफ्तार पार्टीच्या माध्यमातून समाज बांधवांनी एकत्र यावे त्यांच्यात सामाजिक विचारांची समानतेच्या भावनांची रुजवण व्हावी हाच उद्देश असल्याचे महापौर नाईक म्हणाले.

पोलिस आयुक्त प्रसाद यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम करत असताना नवी मुंबई शहरात सर्व धर्मियांनी असणारी एकात्मता पाहता नवी मुंबई हे अशा प्रकारचे समानतेचे शिकवण देणारे एकमेव शहर असल्याचे म्हणाले. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

 

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter