पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत

Posted in News on Jul 23, 2014

पालकमंत्री ना. नाईक यांच्यामुळे पोद्दार शाळेतील प्रकल्पग्रस्तांना फीमध्ये सवलत

ganesh naik

  • नगरसेविका रेखा म्हात्रे यांचा पाठपुरावा
  • सफाई कामगारांना पगारवाढ
  • तीन प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरी

करावे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळावी, यासाठी स्थानिक नगरसेविका रेखा विनोद म्हात्रे व प्रभाग क्रमांक ८९ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष विनोद म्हात्रे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून पोद्दार प्रशासनाने प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत देण्याचे मान्य केले असून शाळेतील कामगारांना भरघोस पगारवाढही दिली आहे. पालकमंत्र्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे करावे गावातील नागरिकांनी त्यांचे शतश: आभार मानले आहेत.
याविषयी माहिती देताना नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले कि, गेल्या दीड महिन्यापासून आम्ही येथील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याची मागणी करीत होतो.
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा करीत होते. अखेर पोद्दार प्रशासनाने या मागण्या मान्य केल्या असून प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना फी मध्ये ५० टक्के सवलत दिली आहे.
शाळेतील सफाई कामगारांना दरमहा ३ हजार ३०० ते ३ हजार ४५० रुपये पगारवाढ दिली आहे. त्यानुसार त्यांचा एकूण पगार ९ हजार २५० ते ९ हजार ७५० इतका झाला आहे. ही पगारवाढ तीन वर्षापासून असून प्रत्येक वर्षाला १० टक्के पगारवाढ करण्यात येणार आहे. तसेच करावे गावातील दीपक भोईर, प्रीती भोईर, व कु. म्हात्रे या प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना क्लार्क या पदावर शाळेने कामावर घेतले आहे.

करावे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुमारे ५० ते ६० प्रकल्पग्रस्तांची मुले शिकत असून या शाळेत ३५ सफाई कामगार आहेत. सफाई कामगारांना पगारवाढ व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत, यासाठी आम्ही पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत होतो. यास यश आले आहे. – विनोद म्हात्रे.

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter