नवी मुंबईकरांना मिळणार लवकरच २४ तास गॅस सेवा

Posted in News on Aug 8, 2014

ganeshnaiknews

  • आ. संदीप नाईक यांची मागणी लवकरच पूर्ण होणार
  • महानगर गॅस कंपनीने आठ दिवसांत सर्व्हे करावा
  • पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे बैठकीत निर्देश

नवी मुंबई शहरातील विविध ठिकाणी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने नवी मुंबईतील नागरिकांकरिता गॅस लाईन टाकून सुविधा देण्याची मागणी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना.नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीने येत्या आठ दिवसात शहरात गॅस पाईप लाईन टाकण्यासंदर्भात सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. नाईक यांनी दिल्या आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत नवी मुंबईकरांना २४ तास गॅस सेवा उपलब्ध होणार आहे.

ऐरोली मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांच्याकडे नागरिकांनी पाईप लाईनच्या माध्यमातून घराघरात गॅस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आ. नाईक यांनी या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्याकडे ही सेवा सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आज (ता.७) झालेल्या जनता दरबारात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला आ. संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे आणि महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती, उपमुख्य व्यवस्थापक दास, मॅनेजर प्रभाकर तांबे त्याच बरोबर नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बैठकीत आ. संदीप नाईक यांनी शहरातील सिडको गावठाण विस्तार योजना परिसरात व माथाडी वसाहतीमध्ये गॅस पुरवठा लाईन टाकण्याबाबत काय कार्यवाही करण्यात येत आहे. त्याच बरोबर ऐरोलीतील नव्याने विकसित होत असलेल्या सेक्टर-२० (ए/बी/सी/डी), घणसोली नोड, कोपरखैरणे सेक्टर – ११ मधील नव्याने विकसित होत असलेल्या परिसराकरिता नवीन गॅस जोडणी संदर्भात आ. नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार महानगर गॅस लिमिटेडने आतापर्यंत काय कार्यवाही केली. या संदर्भातील आढावा आ. संदीप नाईक आणि पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी जाणून घेतला. यावेळी शहरातील मागणी करण्यात येत असलेल्या प्रभागाबरोबरच संपूर्ण शहरातील मागणी करण्यात येत असलेल्या प्रभागाबरोबरच संपूर्ण शहरातील नागरिकांना गॅस पाईप लाईनने गॅस पुरवठा करण्यासंदर्भात येत्या ८ दिवसांत सर्व्हे करण्याचे निर्देश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. या सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर यासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. नाईक म्हणाले. त्यामुळे शहरवासीयांना गॅस लाईनने गॅस पुरवठा होईल आणि नागरिकांना २४ तास गॅस सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री ना. गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी व्यक्त केला. महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती यांनी आ. नाईक यांनी व्यक्त केला. महानगर गॅस लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मुर्ती यांनी आ. नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार संबंधित ठिकाणी गॅस पुरवठा करण्यासाठी लिमिटेड देखील प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter