कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु

Posted in News on Jul 28, 2014

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश

कन्व्हेयन्स डीडसाठी सिडकोकडून लीज डीडची प्रक्रिया झाली सुरु

ganesh naik 1

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व सर्वसामान्य नागरिकांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक थांबावी त्याच बरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्रदान व्हावा यासाठी डीम्ड कन्व्हेयन्सची मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी केली होती. त्यासाठी डॉ. संजीव गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर देखील पाठपुरावा केला होता.

त्यांच्या या प्रयत्नामुळे आता नवी मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आपला मालकी हक्क मिळणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीडची (भाडे पट्टा करार) प्रक्रियेत सर्व सामान्य नागरिकांची बिल्डरांकडून फसवणूक होते.

हि फसवणूक थांबावी त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थेला जमिनीचा मालकी हक्क प्रदान व्हावा यासाठी डीम कन्व्हेन्स (मानीव अभिहस्तांतरण) करणे आवश्यक आहे. अनधिकृत किंवा खाजगी विकासकाकडून बांधण्यात आलेल्या इमारतींचे संपूर्णपणे कायदेशीर मालकी हक्क न मिळाल्याने अशा सोसायट्यांना नवी मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांना यांचा लाभ घेता यावा आणि सहकारी संस्थांची होणारी फसवणूक थांबावी यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता.

त्याच बरोबर मंत्रालयात एक बैठक देखील घेतली होती. त्याच बरोबर डॉ.संजीव गणेश नाईक आणि आ. संदीप नाईक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व सामान्यांच्या प्रश्नी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. नवी मुंबईत सिडकोने विकासकांना करारावर विकलेल्या भूखंडावरील तसेच प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडावरील इमारतीतील रहिवाशांनी स्थापन केलेल्या सरकारी गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीडसाठी लीज डीड ( भाडे पट्टा करार ) करून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

त्यामुळे सहकारी संस्थांना आणि या सोसायट्यामधून राहणाऱ्या लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

या निर्णयाबद्दल डॉ.संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांनी राज्य सरकारचे नवी मुंबईकरांच्या वतीने शतश: आभार मानले आहे.

Back To News….

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeVisit Us On Twitter